शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! सोशल मीडियावर खाण्याचे फोटो शेअर केल्याने वाढतं तुमचं वजन - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 3:36 PM

1 / 7
तुम्ही पाहतच असाल की, लोक सोशल मीडियावर खासकरून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांच्या खाण्या-पिण्याचे फोटो शेअर करत असतात. तुम्हीही असंच काही करत असाल तर वेळी बंद करा. कारण एका रिसर्चमध्ये एक अजब दावा करण्यात आला आहे. एका नव्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, सोशल मीडियावर खाण्याचे फोटो शेअर केल्याने तुमचं वजन वाढू शकतं.
2 / 7
अमेरिकेतील जॉर्जिया साउदर्न यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जे लोक खाण्या-पिण्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतात. त्यांची कंबर प्रभावित होण्याची आणि वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. सर्व्हेतून समोर आलं की, साधारण ७० टक्के मिलेनिअल्स नियमितपणे जेवणाआधी पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
3 / 7
रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या लोकांनी त्यांच्या जेवणाचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले, त्यांना पोट भरलेलं आहे याची जाणीव व्हायला वेळ लागतो. त्यामुळे ते जास्त खातात.
4 / 7
रिसर्च करणाऱ्या टीमने १४५ विद्यार्थ्यांचा यात समावेश केला आणि त्यांना दोन ग्रुपमध्ये विभागलं. दोन्ही ग्रुपला पनीर क्रॅकरची एक प्लेट देण्यात आली होती. पण अर्ध्या लोकांना थांबण्यासाठी आणि एक फोटो घेण्यासाठी सांगण्यात आलं. जेवण केल्यानंतर लगेच सहभागी विद्यार्थ्यांना रेटींग देण्यासाठी सांगण्यात आलं की, त्यांना जेवण किती आवडलं आणि त्यांना आणखी हवं आहे का?
5 / 7
यादरम्यान असं आढळून आलं की, फोटो काढणाऱ्या लोकांनी जेवणातून आनंद मिळण्याला जास्त रेटींग दिलं आणि त्यांना ते पुन्हा हवं होतं. रिसर्चनुसार, फोटो काढल्याने मेंदूत जेवणाकडे बघण्याची पद्धत आणि लालसा वाढली आहे.
6 / 7
वैज्ञानिक म्हणाले की, 'जेवणाच्या आठवणी आणि जेवणाला रेकॉर्ड करण्याचं काम इफेक्ट करू शकतं की, आपण किती खाऊ शकतो. आमचे निष्कर्ष सांगतात की, फोटो काढल्यामुळे जेवण झाल्यावरही जेवणाची जास्त इच्छा निर्माण होते'.
7 / 7
वैज्ञानिकांचा सल्ला आहे की, काही काही वेळाने थोडं थोडं खाणारे लोक, खासकरून स्वादिष्ट जेवण, कारण त्यांना त्यांच्या कॅलरी कमी करायच्या आहेत. त्यांनी ते जे खात आहेत त्यांचे फोटो काढणे टाळले पाहिजे.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य