शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus ला मात दिल्यावर या टेस्ट नक्की करा, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 12:47 PM

1 / 9
जीवघेण्या कोरोना व्हायरससोबतची (Coronavirus) लढाई जिंकलेल्या रूग्णांसाठी हेल्थ एक्सपर्टकडून नुकताच एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना लवकरात लवकर वॅक्सीन (Covid-19 Vaccine) घेण्याचा आणि पोस्ट रिकव्हरी (Post Recovery Test) टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
2 / 9
डॉक्टरांनुसार, कोरोना व्हायरस माणसाच्या इम्युन सिस्टींम आणि शरीराच्या अनेक महत्वपूर्ण अवयवांना मोठं नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे नंतर फार त्रास होण्याची शक्यता असते. अशात जर तुम्ही पोस्ट रिकव्हरी टेस्ट कराल तर हे माहीत करून घेतलं जाऊ शकतं की, तुमचं किती नुकसान झालं आहे? आणि त्याचे काय साइड इफेक्ट्स होऊ शकतात? जेणेकरून वेळेवर रूग्णावर उपचार करून त्यांचा जीव वाचवता येईल.
3 / 9
एंटीबॉडी टेस्ट - कोणत्याही आजारातून रिकव्हर झाल्यावर आपलं शरीर एंटीबॉडी प्रोड्यूस करतं. जे भविष्यात आपल्याला संक्रमणापासून वाचवण्याचं काम करतात. एंटीबॉडीचं प्रमाण आपल्या शरीरात जेवढं जास्त असतं, आपलं इम्यून सिस्टीम तेवढंच सेफ असतं. सामान्यपणे मानवी शरीर १ ते २ आठवड्यात एंटीबॉडी तयार करतं. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, कोरोनातून रिकव्हर झाल्यावर २ आठवड्यांनंतर igG टेस्ट करण्याचा सल्ला देतात.
4 / 9
कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट - या टेस्टच्या माध्यमातून मानवी शरीरातील वेगवेगळ्या सेल्सची टेस्ट केली जाते. याने रूग्णाला याचा अंदाज येतो की, कोरोना संक्रमणाविरोधात त्यांचं शरीर कशाप्रकारे प्रतिक्रिया देत आहे. कोरोनातून रिकव्हरीनंतर रूग्णांनी ही टेस्ट करणं गरजेचं आहे.
5 / 9
ग्लूकोज, कोलेस्ट्रॉल टेस्ट - डॉक्टरांनुसार, कोरोना व्हायरस आपल्या शरीरात इन्फ्लेमशन आणि क्लॉटिंगची समस्या निर्माण करू शकतात. हेच कारण आहे की, रूग्णांमध्ये ब्लड ग्लुकोज आणि ब्लड प्रेशर लेव्हलमध्ये मोठा चढ-उतारर बघायला मिळतो. अशात तुम्ही सर्वातआधी डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि कार्डियकशी संबंधित कोणती समस्या असेल तर रिकव्हरीनंतर रूटीन टेस्ट नक्की करा.
6 / 9
न्यूरो फंक्शन टेस्ट - कोरोनातून रिकव्हरी झालेल्या रूग्णांमध्ये जर ब्रेन फॉग, एन्जायटी, थरथरणे आणि बेशुद्ध होणे अशा समस्या असेल तर त्यांना रिकव्हरीच्या एक आठवड्यानंतर ब्रेन आणि न्यूरोलॉजिकल फंक्शन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जात आहे.
7 / 9
व्हिटॅमिन-डी टेस्ट - कोरोनासंबंधी एका स्टडीमधून दावा करण्यात आला आहे की, रिकव्हरीदरम्यान व्हिटॅमिन-डी सप्लीमेंटेशन रूग्णांसाठी फार महत्वाचं असतं. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता होऊ नये म्हणून याची टेस्ट गरजेची आहे. याने भविष्यात तुम्हाला इतर आजारांपासून बचाव करण्यास मदत होईल.
8 / 9
चेस्ट स्कॅन - कोरोनाचा नवा स्ट्रेन सहजपणे पकडला जात नाही. त्यामुळे डॉक्टर्स HRCT स्कॅन करण्याचा सल्ला देतात. पण ही टेस्ट प्रत्येकाने करण्याची गरज नाही. डॉक्टरांनुसार, ज्या रूग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत, पण RT-PCR टेस्ट निगेटिव्ह येत असेल. तर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने ही टेस्ट करावी.
9 / 9
हार्ट इमेज आणि कार्डियक स्क्रीनिंग - आरोग्य मंत्रालयाचे एक्सपर्ट सांगतात की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट आपल्या शरीरात घातक इन्फ्लेमेशनची समस्या ट्रिगर करतो. ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. अशात ज्या रूग्णांना छातीत वेदना होण्याची तक्रार असेल त्यांनी एकदा नक्की हार्ट इमेज आणि कार्डियक स्क्रीनिंग टेस्ट करावी.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य