women health care heart attack in woman know causes and prevention
चिंताजनक! महिलांमध्ये वेगाने वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; 'ही' आहेत कारणं, 'अशी' घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 4:59 PM1 / 12महिलांची बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत त्याची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या अहवालानुसार, गेल्या 10 वर्षांत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2 / 12जीवनशैलीतील बदल आणि धूम्रपान ही त्याची प्रमुख कारणं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांचा आहार आणि जीवनशैली पूर्वीच्या तुलनेत खूपच बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाणही वाढले आहे. हे टाळण्यासाठी महिलांनी नेमकं काय करावं हे जाणून घेऊया...3 / 12डॉक्टरांच्या मते, दरवर्षी 35% महिलांच्या मृत्यूसाठी हार्ट डिजीज कारणीभूत असतो, जो कॅन्सरपेक्षा जास्त असतो. कोणत्याही वयोगटातील महिलांमध्ये याचा प्रसार होत आहे. असे असूनही महिला याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. हार्ट अटॅकबद्दल महिलांमध्ये माहिती नसल्यामुळेही अधिक मृत्यू होत आहेत.4 / 12डॉक्टरांच्या मते हार्ट डिजीजचं एकच कारण नाही तर अनेक कारणे असू शकतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही याचा फटका बसतो. हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, खराब जीवनशैली आणि उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक झटका येत आहे. 5 / 12यामध्ये मधुमेहासारख्या आजारांचा समावेश आहे. जर योग्य वेळीच याबाबत माहिती मिळाली किंवा त्यातील जोखीम घटक ओळखले गेले, तर महिलांना हा धोका बऱ्याच अंशी कमी करता येईल.6 / 12महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याची काही कारणं आहेत. 1. महिलांमध्ये वाढता ताण आणि दबाव यामुळे तणाव वाढत आहे, त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य होत आहे.7 / 122. खराब जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. 3. नियमित तपासणी आणि आरोग्याबाबत निष्काळजीपणा दाखवला जातो. 8 / 124. आजकाल स्त्रिया धुम्रपान करतात, त्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका असतो. धूम्रपान केल्याने रक्त घट्ट होतं आणि प्लॉक तयार होण्याचा धोका असतो.9 / 125. कोरोना महामारीनंतर हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हार्ट अटॅक हा पोस्ट कोविड इफेक्टसारखा आहे. 10 / 12महिला हार्ट अटॅक कसा टाळू शकतात ते जाणून घेऊया... 1. जीवनशैली निरोगी बनवा, सकस आहार घ्या आणि बाहेरचे खाणे बंद करा. 2. दररोज व्यायाम करा, स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवा.11 / 123. पुरेशी झोप आणि पुरेसे पाणी प्या. 5. दारू आणि सिगारेट पूर्णपणे टाळा. 6. मधुमेह आणि उच्च रक्तदाब पासून स्वतःचे रक्षण करा. 7. वजन नियंत्रणात ठेवा. 8. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.12 / 12धावपळीच्या जीवनात महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं महागात पडू शकतं. आरोग्याविषयक कोणत्याही समस्या जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications