World Stroke Day 2020: 'ही' ४ लक्षणं दिसत असतील तर कधीही उद्भवू शकतो स्ट्रोकचा धोका

By manali.bagul | Published: October 29, 2020 12:15 PM2020-10-29T12:15:58+5:302020-10-29T12:59:48+5:30

स्ट्रोकमुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. मेंदूच्या विशिष्ठ भागांपर्यंत रक्त पुरवठा न झाल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवते. लक्षणं दिसल्यानंतर मेंदूच्या कोणत्या भागात रक्त पुरवठा बंद झाला आहे. याबाबत माहिती मिळते. न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर असल्यास लक्षणांवरून शरीरात कोणत्या आजाराचा शिरकाव झाला आहे याबाबत अंदाज लावता येऊ शकतो.

कोणत्याही व्यक्तीमध्ये स्ट्रोकसंबंधी लक्षणांची ओळख पटल्यास लवकरत लवकर जीव वाचवण्यास मदत होऊ शकते. वैद्यकिय परिभाषेत याला 'FAST' असं म्हणतात. आज जगभरात वर्ल्ड स्ट्रोक डे बद्दल जनजागृती पसरवली जाते. आज आम्ही तुम्हाला या आजाराची लक्षणं आणि वाॉर्निंग साईन्सबद्दल सांगणार आहोत. webmd.com मध्ये या संबंधी तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

आर्म वीकनेस- कोणत्याही व्यक्तीला दोन हात वर उचलण्यास त्रास होत असते. हातांना व्यवस्थित बॅलेन्स करता येत नसेल तर स्ट्रोकचे लक्षण असू शकते.

फेस ड्रूपिंग- हसताना व्यक्तीचा चेहरा एका बाजूला वळत असेल तर या आजाराचा धोका असू शकतो. सामान्य स्थितीत न राहता अनेकदा हसताना चेहरा वाकडा होतो.

जर तुमच्या आसपास कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करून यांसंबंधी माहिती द्या. जेणेकरून वेळेवर रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.

अनेकदा याचा परिणाम माणसाच्या डोळ्यांवरही होऊ शकतो. अशावेळी दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट न दिसता धुसर दिसते. चक्कर येणं हे ही स्ट्रोकचे लक्षण असू शकते.

याव्यतिरिक्त स्ट्रोकची आणखी काही लक्षणं आहेत. यात शरीरातील अवयव खराब होतात. वैद्यकिय परिभाषेत या स्थितीला पॅरेलाईज्ड म्हणतात. या स्थितीत शरीरातील अवयव पूर्णपणे काम करणं बंद करतात.

शरीराच्या काही भागात सुन्न वाटणं, मुंग्या येणं, चालायला त्रास होणं, स्वतःच्या शरीराचा बॅलेन्स सांभाळता न येणं ही लक्षणं दिसून येतात.

स्पीच डिफिकल्टी- एखाद्या व्यक्तीला अशक्तपणामुळे बोलताना त्रास होत असेल किंवा शब्द नीट उच्चारता येत नसतील तर स्ट्रोकशी निगडीत गंभीर समस्या असू शकते. अशा स्थितीत व्यक्तीला शब्द उच्चारण्यासाठी तसंच वाक्य पूर्ण करण्यासाठीही त्रासाचा सामना करावा लागतो.

डोकेदुखी, मेमरी लॉस, वागण्या बोलण्यात बदल, मासपेशीत तीव्र वेदना, घास गिळण्यासाठी त्रास होणं अशी लक्षणं दिसतात.

Read in English