शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! दिवसातून खूपदा खात असाल बिस्कीट, तर जाऊ शकतो तुमचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 4:34 PM

1 / 9
जास्तीत जास्त लोकांना बिस्कीट खाणं आवडतं आणि याकडे लोक हेल्दी स्नॅक्स म्हणूनही बघतात. मात्र, वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, बिस्कीट खाणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. एका रिसर्चनुसार, बिस्कीटमध्ये कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ असतात आणि हे तुमच्या आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतात.
2 / 9
हॉंगकॉंगमधील वैज्ञानिकांना आढळून आलं की, जास्त बिस्कीट खाणं कॅन्सरचा धोका वाढू शकतो. इथे ६० वेगवेगळ्या बिस्कीटांवर रिसर्च करण्यात आला. त्यानंतर हा निष्कर्ष समोर आला. २०१७ मध्ये भारताच्या consumer education and research centre ला आढळून आलं की, देशाच्या निर्मितीत क्रीम बिस्कीट्समध्ये जास्त प्रमाणात शुगर आणि फॅट कंटेटं होतं. हे प्रति किलो २५ ते ३० ग्रॅम आणि १०० किलो २० ग्रॅम होतं.
3 / 9
हॉंगकॉंगमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, बिस्कीट प्री पॅक्ड असतात आणि यात कॅन्सर निर्माण करणारे केमिकल glycidol आणि acrylamide असतात. हे दोन्ही carcinogens आहे आणि कॅन्सरला वाढवू शकतात.
4 / 9
वैज्ञानिकांनुसार, बिस्कीट तयार करणाऱ्या कंपन्या glycidol आणि acrylamide चा वापर करू शकते. पण यासाठी लिमिट ठरवण्यात आली आहे की, किती प्रमाणात या केमिकल्सचा वापर केला जावा.
5 / 9
European Union कमीशन ने बिस्किट्ससाठी एक बेंचमार्क ठरवला आहे आमि ईयूचं म्हणणं आहे की, १ किलो बिस्कीटमद्ये ३५० ग्रॅमपेक्षा जास्त acrylamide चा वापर करू नये. १ किलो बिस्कीटसाठी ३५ ग्रॅमपर्यंत acrylamide सेफ लिमिट आहे.
6 / 9
रिसर्चमध्ये आढळून आलं की, ६० पैकी ५६ सॅम्पल एक organic chemical compound 3 MCPD होते. जो किडनी आणि पुरूषांच्या रिप्रो डक्टिव ऑर्गनला नुकसान पोहोचवतं.
7 / 9
स्टडीनुसार, वयस्क ज्यांचं वजन ६० किलो पर्यंत आहे, त्यांनी या केमिकलची १२० ग्रॅमपेक्षा जास्त मात्रा घेऊ नये. तर काही बिस्कीट्समध्ये 3 MCPD चं प्रमाण प्रति किलो २ हजार पर्यंत असते.
8 / 9
तेच बिस्कीट्सच्या ३३ सॅम्पलमध्ये हाय फॅंट, हाय शुगर आणि १३ हाय सोडिअम कंटेट आढळून आला. रिसर्चमध्ये आढळून आलं की, ४० टक्के बिस्कीट असे होते ज्यात पॅकेटववर न्यूट्रिशनबाबत चुकीच माहिती देण्यात आली होती.
9 / 9
बिस्कीटाला लोक हलकं स्नॅक्स म्हणून बघतात. पण हेल्दी असावेत असं गरजेचं नाही. काही पॅकेट्सवर लिहिलेलं असतं की, यात पूर्णपणे कडधान्य, ओटमीलचा वापर करण्यात आला आहे. तेच काहींवर लिहिलेलं असतं की, हे शुगर फ्री आणि फायबर असतात. पण हेल्थ एक्सपर्ट्सचा सांगणं असतं की, हे सगळं सत्य नसतं.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन