biden administration says india is one of the most important partners of the us in the indo pacific
बायडेन प्रशासनानं स्पष्ट केलं अमेरिकेसाठी काय आहे भारताचं महत्त्व By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 1:58 PM1 / 10डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारताच बायडेन यांनी कामांचा सपाटाच लावला होता.2 / 10दरम्यान, आता आपल्या परराष्ट्र धोरणात भारताला महत्त्वाचं स्थान दिलं जाणार असल्याचं बायडेन प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. 3 / 10अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं मंगळवारी भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत हा आपला महत्त्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं.4 / 10जागतिक शक्ती म्हणून भारताच्या उदय आणि या क्षेत्राचे संरक्षण करण्याच्या भूमिकेचे अमेरिका स्वागत करत असल्याचंही अमेरिकेकडून सांगण्यात आलं.5 / 10यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. गेल्या १५ दिवसांमध्ये अँटोनी ब्लिकंन आणि एस. जयशंकर यांच्यात झालेली ही दुसरी चर्चा आहे.6 / 10या दरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिकेची भागीदारी आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा केली. म्यानमारमध्ये झालेल्या सत्तांतरावरुनही दोघांमध्ये चर्चा झाली. तसंच यावेळी ब्लिंकन यांनी यावर चिंता व्यक्त करत त्याठिकाणी कायदा सुव्यवस्था आमि लोकशाही काय राहिली पाहिजे असं मत व्यक्त करण्यात आलं. 7 / 10दोन्ही बाजूंनी क्वॉड सहित क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवली आहे, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिली. क्वॉडमध्ये भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. क्वॉडला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनला काऊंटर करण्याच्या दृष्टीनंही पाहिलं जातं. 8 / 10भारत आणि अमेरिकेच्या रणनितीक सहकार्याची व्याप्ती अधिक विस्तृत आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत काम करत आहोत. भारत हा आमचा महत्त्वाचा व्यापारी भागीदारदेखील आहे. २०१९ मध्ये दोन्ही देशांमध्ये तब्बल १४६ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता. याव्यतिरिक्त भारतात परदेशी गुंतवणूकीलादेखील वाव असल्याचं त्यांनी नमूद केलं. 9 / 10अमेरिकेत तब्बल ४० लाख भारतीय वास्तव्यास आहेत आणि त्यांचं आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान असल्याचंही प्राइस म्हणाले. 10 / 10यावेळी चीन बाबत बोलताना अँटोनी ब्लिंकेन यांनी चीनविरोधात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण अतियश योग्य असल्याचं म्हटलं, तसंच बायडेन प्रशासनही चीनविरोधात मजबूतीनं उभं राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications