British man sells bhelpuri during India's World Cup match
क्रिकेटप्रेमींसाठी परदेशातही मिळतोय चटकदार भेळचा आस्वाद By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 01:22 PM2019-06-12T13:22:54+5:302019-06-12T13:26:17+5:30Join usJoin usNext भाजलेल्या शेंगा आणि चटकदार भेळ खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. या अशा गोष्टी आहेत की परदेशात गेल्यावर भारतीय लोकांना याची आठवण येते. सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा महासंग्राम रंगला आहे. वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी आणि फिरणासाठी गेलेल्या लोकांना आता या दोन्ही गोष्टी इंग्लंडच्या रस्त्यावर खायला मिळत आहेत. भारताततील बहुतांश लोकांना भुईमुगाच्या शेंगा, किंवा खारे शेंगादाणे आणि भेळ खायला आवडते. हीच आवड भारताबाहेर गेल्यावर आपल्याला पूर्ण करता येत नाही. पण, लंडनच्या रस्त्यांवर काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे नागरिक राहतात. या व्यतिरिक्त वर्ल्डकप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय लंडनमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे तेथे भारतीय खाद्य पदार्थांची मागणी चांगलीच वाढली आहे. त्यामुळेच अशी दृष्ये दिसत आहेत. भारतीयांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लंडनच्या रस्त्यांवर सध्या भारताप्रमाणेच भुईमुगाच्या शेंगा आणि भेळ विकणारे स्टॉल्स लागले आहेत. हे विक्रेते दुसरे तिसरे कोणी नसून भारतावर राज्य करणारे ब्रिटीशच आहेत. मैद्याच्या चपट्या पुऱ्या किंवा मग चमचाच्या सहाय्याने या भेळीवर ताव मारला जातो. अशी ही भेळ साहेबांच्या देशात म्हणजेच थेट इंग्लंडमध्येही विकली जाते