शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय आहे '996', ज्यामुळे चीनच्या तरुणांची उडालीय झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 2:25 PM

1 / 9
चीनमधील तरुणांना सध्या एका गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. 996 असे या समस्येचं नाव आहे. बऱ्याचदा अनेक तरुणांनी यासंबधी चर्चा केली आहे. काही ठिकाणी तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत. मात्र, या समस्येवर उपाय झालेला दिसून येत नाही.
2 / 9
सध्या चीनमध्ये डिजिटल कामकाज मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे इंजिनीअर, कोडर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, गेम डिझाईनर आणि आयटी सेक्टरमधील अनेक लोक 996 मुळे त्रस्त आहेत. त्यांची रात्रीची झोप 996 मुळे उडाली आहे.
3 / 9
खरंतर, 996 म्हणजे, आठवड्यातील सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत काम करण्याची वेळ. ही वेळ कर्मचाऱ्यांच्या मर्जीने ठेवली नसून दबामुळे ठेवल्याचे समजते. यासाठी काही पगारवाढ किंवा सुविधाही दिल्या नसल्याचे समजते.
4 / 9
996 मुळे चीनमधील जास्तकरुन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तरुणांचा वर्क-लाईफ बॅलन्स बिघडला आहे. त्यामुळे याठिकाणी 996 ची तक्रार करत आहेत.
5 / 9
गेल्या काही दिवसांपूर्वी एका चीनी तरुणांने वृत्तसंस्था एएफपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हा विषय संपूर्ण जगात वादाचा मुद्दा बनला आहे. एका वर्षानंतर एखाद्या मुलीसोबत बोलत असल्याचे यावेळी एएफपीच्या रिपोर्टरशी बोलताना या तरुणाला वाटले.
6 / 9
उल्लेखनीय म्हणजे, 996 असे काम करणाऱ्या कंपन्यामध्ये हुआवाई, अलीबाबा यासारख्या कंपन्यांची नावे आहे. सध्या काही देशांमध्ये अशा चीनच्या कंपन्यांची लिस्ट व्हायरल होत आहे, त्यामध्ये 996 फॉर्म्युला लागला आहे.
7 / 9
असे सांगण्यात येते की, चीनमध्ये जवळपास 139 कंपन्या आहेत. ज्यामध्ये 996 फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. चीनमधील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'वीवो'वर #996 द्वारे करण्यात पोस्टना 1.5 करोड वेळा पाहिले आहे.
8 / 9
दरम्यान, अद्याप 996 फॉर्म्युल्यावर चीन सरकार अथवा येथील प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र, कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र पीपल्स डेलीने चीममधील 40 तासांच्या वर्कवीक कायद्याचा हवाला देत 996 फॉर्म्युला चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
9 / 9
जगात सर्वात जास्त काम करणाऱ्या देशात जपानच्या लोकांचे नाव घेतले जात होते. मात्र, आता जपानमध्ये श्रम कायदा तयार करण्यात आला आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानchinaचीनEmployeeकर्मचारी