शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गद्दाफीच्या मॉडेल सुनेचे सासऱ्याच्या पावलावर पाऊल; वाहतूक पोलिसांनी थांबवताच कारखाली चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 12:39 PM

1 / 10
लिबियामध्ये हुकुमशहा राहिलेल्या कर्नल मुअम्मर गद्दाफीच्या सुनेने आपल्या सासऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. वाहतुकीचे नियम तोडले म्हणून अडविल्याने तिने पोलिसांसह सामान्य नागरिकांना आपल्या गाडीखाली चिरडण्य़ाचा प्रयत्न केला.
2 / 10
गद्दाफी हा क्रूर हुकुमशहा म्हणून जगभरात परिचित होता. त्याने लिबियावर 1969 पासून राज्य केले होते. ऑक्टोबर 2011 मध्ये त्याला ठार मारण्यात आले.
3 / 10
त्याची सून अलाइन स्काफ ही आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जात आहे. रस्त्यावर लोकांना उडविल्यानंतर तीने तेथून पलायन केले.
4 / 10
स्काफच्या सुरक्षेसाठी पाठीमागच्या वाहनात बसलेल्या सुरक्षारक्षकांनी हवेत गोळ्याही झाडल्या. स्काफला आता सिरियाचे सुरक्षा एजंट शोधत आहेत. तिच्यावर आरोप आहे की तिने वाहतुकीचे नियम तोडले.
5 / 10
तिला थांबविल्यावर तिने तीन पोलीस आणि दोन नागरिकांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतर ती पळून गेली.
6 / 10
स्काफ ही एक पूर्वाश्रमीची मॉडेल आहे. तिला गद्दाफीच्या विचारसरणीच्या बाजुने असलेल्या एका पोलिसाने जायला दिले, असे सोशल मिडीयावर सांगतिले जात आहे. यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना आहे. तर सिरियाई सुरक्षा विभागाने सांगितले की, तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.
7 / 10
स्काफ ही गद्दाफीचा मुलगा हनीबल याची पत्नी आहे. त्याच्यावर सिरियामध्ये अलिशान आयुष्य जगण्याचा आरोप आहे. त्याला सरकराकडून मोठ्या प्रमाणावर सूट आणि सुविधा मिळतात असा विरोधकांचा आरोप आहे. 45 वर्षांचा हनीबल लिबियावर राज्य करणाऱ्या गद्दाफीचा पाचवा मुलगा आहे.
8 / 10
2011 मध्ये हनीबलने वडील हुकुमशहा गद्दाफीने लिबियामध्ये सत्ता गमावल्यानंतर देश सोडला होता. त्याने लिबियातून पलायन करून अल्जिरियामध्ये वास्तव्य केले होते. यानंतर तो ओमानला शरण गेला.
9 / 10
2015 मध्ये त्याला एका जुन्या प्रकरणात लेबनॉनमध्ये अटक करण्यात आली. गेल्या वर्षीच्या एका रिपोर्टनुसार तो आजही जेलमध्ये आहे.
10 / 10
अलाइन स्काफ ही पूर्णपणे भाजली होती. यामुळे तिचा चेहरादेखील विद्रूप दिसत होता. सासऱ्याचे गुन्हे पाहून तिने पुन्हा लेबनॉनला जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पतीने तिला जबर मारहाण केली होती. तसेच तिला कोंडून ठेवले होते.
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस