शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: ६० अंश सेल्सियस तापमानातही जिवंत राहतो कोरोना; शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 4:32 PM

1 / 11
कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून, शास्त्रज्ञसुद्धा त्यावर लच बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.
2 / 11
आता शास्त्रज्ञांनी नवा शोध लावला असून, उच्च तापमानातदेखील हा विषाणू बर्‍याच काळासाठी सक्रिय राहू शकते.
3 / 11
फ्रान्समधील शास्त्रज्ञांच्या एका टीमनं केलेल्या संशोधनात हे उघड झाले आहे. हा विषाणू उच्च तापमानात जिवंत राहू शकत नाही, असा दावा केला जात होता.
4 / 11
दक्षिण फ्रान्समधील एइक्स मार्सिएले विद्यापीठाच्या प्रोफेसर रेमी शेरेल यांनी आपल्या सहका-यांसमवेत ही चूक उघडकीस आणली आहे.
5 / 11
या चाचणीत रेमीने कोरोना विषाणूची ६० डिग्री सेल्सियस तापमानात तपासणी केली. ६० डिग्री सेल्सिअस तापमानात एक तास चाचणी घेतल्यानंतर हा विषाणू जिवंत राहत असल्याचं समोर आलं असून, तो इतरांना संक्रमित करण्यात सक्षम असल्याचंही समोर आलं आहे.
6 / 11
भारतात उष्णता जास्त असल्यानं कोरोना विषाणू फार काळ टिकणार नाही, असासुद्धा दावा केला जात होता. परंतु तो दावा आता या संशोधनानं मोडीत निघाला आहे.
7 / 11
या संशोधनासाठी वैज्ञानिकांच्या टीमनं आफ्रिकेतल्या एका विशिष्ट प्रजातीच्या माकडांच्या मूत्रपिंड आणि पेशींना संक्रमित केले.
8 / 11
हा विषाणू बर्लिनमधील एका स्वतंत्र कोरोना रुग्णाच्या शरीरातून घेण्यात आला होता. या विषाणूची दोन भिन्न वातावरणात चाचणी घेण्यात आली आहे.
9 / 11
कोरोना विषाणू उच्च तापमानात निष्क्रिय झाल्याचं समोर आलं. परंतु अस्वच्छ वातावरणात वाढलेला विषाणू अद्यापही संसर्ग पसरविण्यासाठी सक्रिय होता, असंही स्पष्ट झालं.
10 / 11
उच्च तापमानात विषाणू कमकुवत होतो हे खरं असलं तरी त्याच्यात संसर्ग पसरविण्याची पुरेशी क्षमता होती.
11 / 11
फ्रेंच शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की, ही समस्या जास्त तापमानातच सोडविली जाऊ शकते. उदाहरणार्थ, व्हायरसचे नमुने १५ मिनिटांसाठी ९२ डिग्री सेल्सियस तापमानात पूर्णपणे निष्क्रिय केले जाऊ शकतात.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या