Coronavirus : 'कदाचित कोरोना व्हायरस वॅक्सीनची गरजच पडणार नाही, आपोआपच दूर होईल संकट'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 12:46 PM2020-04-19T12:46:21+5:302020-04-19T13:05:55+5:30

Coronavirus : इयान यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार करणं वॅक्सीन डेव्हलपर्ससाठी एक मोठं आव्हान आहे.

कोरोना व्हायरसची वाट पाहत असलेल्या लोकांच्या अपेक्षावर ऑस्ट्रेलियातील एका वॅक्सीन डेव्हलपरने मोठा धक्का दिला आहे. इम्यूनोलॉजीचे प्राध्यापक इयान फ्रेजर यांनी मत व्यक्त केलं की, कोविड-19 ची वॅक्सीन भविष्यात कदाचित तयारच होऊ शकणार नाही. यासाठी त्यांनी काही महत्वपूर्ण कारणेही समोर ठेवली आहेत.

dailystar.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ क्वींसलॅंडमधील प्राध्यापक इयान फ्रेजर यांनी सर्वाइकल कॅन्सरची वॅक्सीनसारख्या औषधाचा आविष्कार केला आहे. इयान यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार करणं वॅक्सीन डेव्हलपर्ससाठी एक मोठं आव्हान आहे. (Image Credit : dailystar.co.uk)

प्राध्यापक इयान म्हणाले की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन कदाचित कधीच तयार होऊ शकणार नाही. पण जगभरात थैमान घालणाऱ्या या जीवघेण्या व्हायरसचा प्रभाव हळूहळू आपोआप कमी होऊ लागेल.

इयान म्हणाले की, 'जगभरात कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनवर साधारण 100 वेगवेगळ्या टीम रिसर्च करत आहेत. पण अजूनही वैज्ञानिकांकडे असं कोणतंही मॉडेल नाही, ज्यातून हे समजेल की अखेर या व्हायरसचा शरीरात अटॅक कसा होतो.

कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनवर स्वत: इयान आणि त्यांची टीम काम करत आहे. त्यांनी दावा केला आहे की, कोविड-19 ची लक्षणे ही सामान्य सर्दी-खोकल्यासारखीच आहेत.

इयान यांनी सांगितले की, अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिसीज म्हणजे श्वसनासंबंधी अवयवासाठी वॅक्सीन तयार करणं एक कठिण काम असतं. कोरोना व्हायरस आपल्या शरीरात पसरण्याऐवजी फुप्फुसात कोशिकांच्या सरफेसवर राहतो.

तर इतर फ्लू व्हायरसबाबत शरीर टी-सेल्स तयार करून तुमची रक्षा करतं. पण कोरोना व्हायरस तुमच्या शरीरातील सेल्सना मारत नाही तर त्यांना आजारी करतो. कमजोर करतो.

अशात वैज्ञानिकांसाठी हे समजणं फार अवघड आहे की, एखादी वॅक्सीन कशाप्रकारे कोरोना व्हायरसवर आपला प्रभाव दाखवेल. अशात हेही सांगणं कठीण आहे की, वॅक्सीनवर टेस्ट करणाऱ्या 100 टीमपैकी कुणाला यश मिळू शकेल की नाही.

दरम्यान, प्राध्यापक इयान यांनी एक महत्वाची सांगितली की, 2003 मध्ये चीनमध्येच जन्मलेल्या SARS साठी कोणत्याही प्रकारची वॅक्सीन तयार करण्यात आली नव्हती. तरी सुद्धा यांचं संकट आपोआप दूर झालं होतं. कोरोना व्हायरसबाबतही असंच होऊ शकतं.

जगभरात कोरोना व्हायरसचे आतापर्यंत 23 लाखांपेक्षा अधिक रूग्ण समोर आले आहेत. तर दीड लाखांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचा अमेरिकेला सर्वात जास्त फटका बसला आहे.