Coronavirus जगभरात मृत्यूंचा आकडा १५००० पार; भारताच्या दुप्पट लोकसंख्या घरात बंद By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 07:46 PM 2020-03-23T19:46:32+5:30 2020-03-23T19:54:30+5:30
एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या ५ हजारावर जाऊन पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या चीनमध्ये या व्हायरसचा जन्म झाला तिथे केवळ सव्वा तीन हजार लोकांचाच मृत्यू झाला आहे. Corona Virus Outburst एकवीसाव्या शतकामध्ये जग एका भयानक संकटातून जात आहे. कोरोनाने जगभरातील १८८ देशांना कवेत घेतले असून मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.
एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या ५ हजारावर जाऊन पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या चीनमध्ये या व्हायरसचा जन्म झाला तिथे केवळ सव्वा तीन हजार लोकांचाच मृत्यू झाला आहे.
भारतामध्ये आज आठव्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. कोलकातामध्ये ६४ वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला. तर स्पेनमध्ये आजच्या दिवसभरात ४६२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
पृथ्वीवर एकूण ७.७ अब्ज लोकसंख्या राहते. यापैकी १ अब्ज म्हणजेच १२० कोटींच्या आसपास लोक घरामध्ये बंद झाले आहेत.
आजचा भारतातील संचारबंदीचे आदेश पाहता जवळपास आणखी १३० कोटी लोक घरामध्ये बंद राहणार आहेत. म्हणजेच हा आकडा अडीचशे कोटींवर जाणार आहे. हा आकडा ५० देशांचा आहे.
न्युझीलंडमध्येही व्हायरस पसरायला लागला असून गेल्या २४ तासांत ४८ नवे रुग्ण सापडले आहेत. तर स्पेनमध्ये एकूण २१८२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३.५ लाखांवर गेला असून 15,408 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी १ लाखावर लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. तर 237,253 एवढे रुग्ण विविध देशांमध्ये उपचार घेत आहेत.
भारतात १६ राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर आतापर्यंत 380 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ४१ परदेशी नागरिक आहेत. महाराष्ट्र, पंजाबमध्ये नागरिक ऐकत नसल्याने संचारबंदीच लागू करण्यात आली आहे.
अमेरिका जगातील तिसरा सर्वाधिक कोरोनाग्रस्त देश बनला आहे. अमेरिकेने स्पेन, इटली, ईराणला मागे टाकले आहे. अमेरिकेत ३५ हजार लोकांना बाधा झाली असून ४६२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमध्ये इस्लामाबादसह, कराची आणि अन्य शहरांमध्ये लष्कराला रस्त्यावर उतरावे लागले आहे. भारतात ही परिस्थिती नसून गरज पडल्यास भारतीय जवानही रस्त्यांवर गस्त घालणार आहेत.
सार्क देशांमध्ये कोरोनाचा फटका पाकिस्तानला बसला आहे. येथे ८०४ कोरोनाचे रुग्ण असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सर्वाधिक सिंध आणि पंजाब प्रांत प्रभावित झाले आहेत.