Coronavirus: must live under the terror of Corona; WHO expert claims no vaccine is guaranteed pnm
Coronavirus: कोरोनाच्या दहशतीखालीच जगावं लागणार; लस मिळण्याची हमी नाही, WHO तज्ज्ञाचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 3:40 PM1 / 10चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनानं संपूर्ण जगावर संकट निर्माण केलं आहे. आतापर्यंत २० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाख ६० हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.2 / 10कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत जात असून सध्यातरी या रोगावर कोणतंही औषध उपलब्ध नाही, दोन-तीन औषधांचे मिश्रण करुन कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. 3 / 10बहुतांश देशांनी कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे पण अद्याप त्याला यश मिळालं नाही. तोपर्यंत सोशल डिस्टेंसिंग हा एकमेव पर्याय सध्या कोरोनाशी लढण्यासाठी वापरला जात आहे. 4 / 10मानवाला नजीकच्या काळात कोरोना विषाणूच्या धोक्यासह जीवन जगावे लागेल. लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील ग्लोबल हेल्थचे प्राध्यापक डेव्हिड नाबरो यांनी अशाप्रकारचा इशारा दिला आहे. नाबरो जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) दूत म्हणून कार्यरत आहेत. द गार्डियन डॉट कॉमच्या अहवालानुसार नाबरो यांनी सांगितले की कोरोनावर लस यशस्वीरित्या तयार होईल याची हमी नाही.5 / 10ग्लोबल हेल्थच्या प्राध्यापकांच्या मते, लोकांना नवीन वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूची लस लवकरच येईल असे लोकांनी गृहित धरू नये.6 / 10डेव्हिड नाबारो म्हणाले की, 'मूलत: प्रत्येक विषाणूविरोधात सुरक्षित आणि प्रभावी लस बनवता येत नाही. काही विषाणूचे लसीकरण तयार करणे फारच अवघड आहे. म्हणूनच, व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आपल्याला आपले जीवन जगण्याचे नवीन मार्ग शोधावे लागतील.7 / 10'ज्या लोकांना या रोगाची लक्षणे आहेत त्यांना वेगळे करावे लागेल आणि जे त्यांच्या संपर्कात असतील त्यांना. ज्येष्ठांचे संरक्षण करावे लागेल. या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयाची क्षमता वाढवावी लागेल असं संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ म्हणाले8 / 10यापूर्वी, डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्याने असेही म्हटले आहे की कोरोनाचा संसर्ग झाल्यावर असा कोणते पुरावे नाहीत ज्याने आजारापासून रोगप्रतिकारक बनले जाईल.9 / 10डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक माईक रायन म्हणाले की, कोणालाही माहिती नाही की ज्याच्या शरीरात अँन्टीबॉडीज असतात ते लोक आजारापासून पूर्णपणे सुरक्षित असतात.10 / 10दक्षिण कोरियामध्ये १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांच्या उपचारानंतर त्यांना पुन्हा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications