Coronavirus: Novel predicted the deadly virus 40 years ago
कोरोना व्हायरसची 'या' पुस्तकातून 40 वर्षांपूर्वी करण्यात आली होती भविष्यवाणी! By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 2:20 PM1 / 7चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये बळी गेलेल्यांची संख्या 1770 वर पोहोचली आहे.2 / 7विशेष म्हणजे, कोरोना व्हायरससंबंधी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या व्हायरसमुळे 1981 मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी पुन्हा एकदा 40 वर्षानंतर चर्चेत आली आहे. 3 / 7‘द आय ऑफ डार्कनेस’ असे या पुस्तकाचे नाव आहे. अमेरिकन लेखक डीन कुंटज यांनी हे पुस्तक लिहिले आहे. 4 / 7या कादंबरीच्या पुस्तकात वुहान -400 या व्हायरसचा उल्लेख आढळतो. वुहान व्हायरसचा एका प्रयोग प्रयोगशाळेतून जैविक शस्त्र म्हणून तयार करण्यात आला असल्याचे येथे नमूद करण्यात आले आहे.5 / 7सोशल मीडियात या पुस्तकासंबंधीची माहिती व्हायरल होत आहे. डॅरेन प्लेमाउथ यांनी सर्वात आधी ट्विटरवर या पुस्तकाची माहिती पोस्ट केली. त्यानंतर सर्वत्र हे पुस्तक चर्चेला आले. 6 / 7दरम्यान, पुस्तकात वुहानबद्दल इतक्या स्पष्टपणे लिहिलेले वाचून लोक आश्चर्यचकित होत आहेत. तर काही लोकांनी हा निव्वळ योगायोग असल्याचे म्हटले आहे. 7 / 7मात्र, बर्याच जणांनी पुस्तकातून कोरोना व्हायरची भविष्यवाणी केल्याचे म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications