Coronavirus Vaccine Research Fierce Battle Between Spies In Worldwide
Coronavirus: कोरोना संपवणारं ‘ब्रह्मास्त्र’ चोरण्यासाठी गुप्तहेरांमध्ये छुपं युद्ध; अमेरिका, चीन अन् रशिया सज्ज By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 10:31 AM1 / 11चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनानं संपूर्ण जगासमोर आव्हान उभं केले आहे. या महामारीतून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक देशातील वैज्ञानिक दिवसरात्रं मेहनत घेत आहे. अनेक देश कोरोना लस शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 2 / 11जगभरात कोरोना विषाणूच्या महामारीनं एक भयानक रूप धारण केलं आहे आणि हे संकट संपुष्टात आणण्यासाठी रामबाण लशीचा शोध घेणे सुरु आहे. एकीकडे रशिया, अमेरिका आणि चीन कोरोना विषाणूची लस लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचा दावा करत आहे परंतु दुसरीकडे कोरोनावर मात देणारं ‘ब्रह्मास्त्र’ हस्तगत करण्यासाठी जगभरातील गुप्तहेरांमध्ये युद्ध सुरू झालं आहे.3 / 11चीनी गुप्तहेर अमेरिकन विद्यापीठांमधील कोरोना विषाणू लसीचा डेटा मिळवण्यासाठी धडपडत आहेत. हे करणे त्यांच्यासाठी सोपे लक्ष्य आहे असं त्यांना वाटत आहे. औषध कंपन्यांच्या हेरगिरीसाठी अमेरिकन विद्यापीठांवर लक्ष ठेवणे सोपे आहे. 4 / 11हे चीनी गुप्तहेर नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटी आणि इतर शाळांमध्ये डिजिटल पाळत ठेवत आहेत जिथे कोरोना विषाणूच्या लसीवर व्यापक संशोधन केले जात आहे.5 / 11ही लढाई जिंकण्यासाठी केवळ चीनचे गुप्तहेरच नव्हे तर रशियाची प्रमुख गुप्तहेर संस्था एसव्हीआर देखील अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील कोविड लस नेटवर्कला लक्ष्य करीत आहेत. 6 / 11यूकेच्या गुप्तचर यंत्रणेने या छुप्या पाळत ठेवण्याचा भांडाफोड केला आहे जी फायबर ऑप्टिक केबल्सवर नजर ठेवते. इतकेच नव्हे तर कोरोना विषाणूच्या लसीवरील संशोधनात चोरी करण्यातही इराणचा सहभाग आहे.7 / 11दुसरीकडे, अमेरिकेने देखील आपल्या विरोधकांविरूद्ध हेरगिरी अधिक तीव्र केली आहे आणि त्याच वेळी अमेरिकन संस्थांची सुरक्षा वाढविली आहे. थोडक्यात, जगातील सर्व प्रमुख गुप्तचर संस्था एकमेकांच्या कोरोनाशी संबंधित संशोधन चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. 8 / 11दुसरीकडे, अमेरिकेने देखील आपल्या विरोधकांविरूद्ध हेरगिरी अधिक तीव्र केली आहे आणि त्याच वेळी अमेरिकन संस्थांची सुरक्षा वाढविली आहे. थोडक्यात, जगातील सर्व प्रमुख गुप्तचर संस्था एकमेकांच्या कोरोनाशी संबंधित संशोधन चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. 9 / 11अमेरिकेच्या सर्व शत्रूंनी अमेरिकन संशोधन चोरण्यासाठी प्रयत्न वाढविले आहेत. त्यास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने कोरोनाशी संबंधित सर्वात आधुनिक संशोधन करणार्या आपल्या विद्यापीठे आणि कंपन्यांची सुरक्षा वाढविली आहे. 10 / 11आतापर्यंत रशियन टँक आणि दहशतवादी नेटवर्कच्या हालचालींवर नजर ठेवणारे नाटोचे गुप्तचर अधिकारी आता लस संशोधन चोरण्याच्या रशियन प्रयत्नांवर नजर ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. 11 / 11गुप्तचर यंत्रणांमधील हे युद्ध अशाच प्रकारे आहे जे शीत युद्धाच्या दिवसांत सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेदरम्यान असतं. आणखी वाचा Subscribe to Notifications