शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कदाचित HIV अन् डेंग्यूप्रमाणे कोरोनावरही लस उपलब्ध होणार नाही, शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 8:50 AM

1 / 12
कोरोना व्हायरसने जगात धुमाकूळ घातला असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर या कोरोनाचे विपरीत परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. रुग्णांवरील उपचारानंतर कोरोना बरा होतो, पण अद्याप या रोगावर परफेक्ट अशी लस निघाली नाही.
2 / 12
कोरोना लसचे संशोधन करणाऱ्या काही तज्ञांच्या मते, डेंग्यु अन् एचआयव्ही या रोगांप्रमाणे कोरोनावरही लस मिळेलच असे सांगता येणार नाही. कोरोनावरही योग्य उपचाराची लस न मिळण्याचा दावा काही तज्ञांकडून करण्यात आला आहे.
3 / 12
जगभरात दररोज हजारो लोकांचे बळी घेणाऱ्या कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटना कामाला लागली आहे. मात्र, अद्याप या रोगावर लस शोधण्यात यश आले नाही. अनेक देशात कोरोनावरली लसची चाचणीही घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप तशी लस उपलब्ध झाली नाही.
4 / 12
कोविड १९ या रोगावर आत्तापर्यंत जगभरात १०० पेक्षा अधिक लसींसवर ट्रायल सुरु आहे. इंग्लंड आणि अमेरिकेत या रोगावरील लसीचा वापर माणसांवर करुन पाहिलं जात आहे. मात्र, अद्याप प्रभावी लस भेटली नाही. त्यामुळे, जर या रोगावर लस उपलब्धच झाली नाही तर काय होईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
5 / 12
सीएनएनच्या एका अहवालानुसार, जर कोरोना व्हायरसवर लस शोधण्यात आली नाही, कोरोना व्हायरसला सोबत घेऊनचा आपल्याला जगावं लागेल, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. तर, इतक्या लवकर काहीच होईल, असं वाटत नसल्याचंही काहींनी म्हटलं आहे.
6 / 12
इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनचे जागतिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक डॉ. डेविड नाबरो यांनी कोरोना लससंदर्भात सविस्तरपणे चर्चा केली आहे. जगभरात असे अनेक व्हायरस आहेत, ज्यांची अद्याप लस शोधण्यातच आली नाही.
7 / 12
त्यामुळे कोरोना रोगावरील लस कधीपर्यंत बनविण्यात येईल, याचा काहीच अंदाज बांधता येणार नसल्याचे नाबरो यांनी स्पष्ट केले. तसेच, जर लस शोधण्यात आली, तरी सुरक्षिततेसंदर्भात सर्व चाचण्यांवर यशस्वी होईल, याचीही शास्वती नसल्याचे त्यांनी म्हटले.
8 / 12
कोरोनावर लस शोधण्यात न आल्यास कोरोनासोबतच आपणास जगावं लागेल, हळूहळू अनेक देशातील लॉकडाऊन उघडण्यास सुरुवात होईल. अनेक देशात सेल्फ आयसोलेशन जगण्याचा भाग बनला आहे.
9 / 12
नॅशनल इंस्टीट्युट ऑफ एलर्जी अँड इंफेक्शियस डिसीजचे डायरेक्टर एँथोनी फॉसी यांच्यासह जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी १२ ते १८ महिन्यात कोरोनावर लस शोधण्यात येईल, असा दावा केला आहे.
10 / 12
एचआयव्ही आणि डेंग्यु, मलेरियाप्रमाणे कोरोना व्हायरसमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन होत नाही, त्यामुळे या व्हायरसवर लस शोधली जाऊ शकते, असेही अनेक वैज्ञानिकांनी म्हटलंय.
11 / 12
एचआयव्ही आणि डेंग्यु, मलेरियाप्रमाणे कोरोना व्हायरसमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन होत नाही, त्यामुळे या व्हायरसवर लस शोधली जाऊ शकते, असेही अनेक वैज्ञानिकांनी म्हटलंय.
12 / 12
कोरोनावरील लस बनविण्यासाठी प्लान ए आणि प्लान बी गरजेचा आहे. कोरोनावर नक्कीच लस शोधली जाऊ शकते, असे नॅशनल स्कुल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनचे डॉक्टर पीटर हॉट्ज यांनी म्हटलंय.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLondonलंडनAmericaअमेरिकाdoctorडॉक्टर