शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हुकूमशहा किम जोंग उननं व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरीला डोळा मारला, त्यावर डोनाल्ड टम्प म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 10:19 AM

1 / 11
व्हाईट हाऊसच्या माजी प्रेस सेक्रेटरीने उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. माजी प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी आपल्या नवीन पुस्तकात सांगितले आहे की, किम जोंग उनने एकदा माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
2 / 11
जून २०१८ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सिंगापूर समिटला गेले होते तेव्हा सारा त्यांच्यासोबत होती. साराच्या म्हणण्यानुसार किम जोंग उनने तिला डोळा मारला होता. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना नंतर साराने याबद्दल सांगितले तेव्हा ट्रम्प यांनीही तिची थट्टा केली. ट्रम्प हसून म्हणाले, किम जोंगने तुझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याने तुझ्यावर लाईन मारली.
3 / 11
ट्रम्प यांनी साराला गंमतीत सांगितले की, आता तू आमच्या फायद्यासाठी उत्तर कोरियाला जात आहेस.
4 / 11
द गार्डियनच्या अहवालानुसार, सारा सँडर्सचे पुस्तक स्पीकिंग फॉर माय सेल्फी पुढील मंगळवारी प्रसिद्ध होईल. पुस्तकाची एक प्रत गार्डियनकडे आहे. रिपब्लिकन पार्टीशी संबंधित असलेल्या कुटुंबातील एक सारा सँडर्स आहे. त्यांचे वडील माइक हकाबी हे २००८ आणि २०१६ मध्ये अध्यक्षपदासाठी उभे राहिले होते. सध्या अरकानाकसमधील राज्यपालांच्या शर्यतीवर त्यांचे लक्ष आहे.
5 / 11
रिपोर्टनुसार साराने किम जोंग उन यांच्यासह सिंगापूर समिटचा उल्लेख केला आहे. किम आपल्या सुरक्षिततेबद्दल खूप सावध आहे आणि इतर कोणताही नेता किंवा व्यक्तीपेक्षा लवकर काहीही स्वीकारत नाही. ट्रम्प यांनी किमला विश्वास दिला होता की, ती फक्त ब्रीद मिंट आहे आणि विषारी कॅप्सूल नाही.
6 / 11
किम जोंग उन आणि ट्रम्प यांच्यातही स्पोर्ट्स, विशेषत: महिला सॉकरबद्दल संभाषण झाले. सारा यांनी लिहिले आहे की, तिने किमला अचानक तिच्याकडे एकटक बघताना पाहिले. आमचे डोळे एकमेकांवर लागले होते. तितक्यात किमने मला डोळा मारला तेव्हा मला धक्का बसला. मी ताबडतोब खाली पाहिले आणि नोट्स घेत राहिले. आता काय झाले आहे? याचाच मी विचार करत बसले.
7 / 11
किम जोंग-उन यांची भेट घेतल्यानंतर साराने ट्रम्प यांना विमानतळाकडे जात असताना बीस्ट कारमध्ये बसून घटनेची माहिती दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी आश्चर्याने सांगितले की, त्याने तुझ्यावर लाईन मारली. आपण या सर्व गोष्टी गंमतीने सांगितली नव्हती. त्यानंतर त्यांनी ही चर्चा थांबवण्यास सांगितले.
8 / 11
ट्रम्प विनोदाने म्हणाले की, मग आता बरे झाले, तू आमच्यासाठी उत्तर कोरियाला जात आहेस. तुझा नवरा आणि मुले तुझी आठवण काढतील पण आपल्या देशासाठी तू नायक होशील. त्यानंतर ट्रम्प जोरजोरात हसायला लागले.
9 / 11
ट्रम्प यांनी किम जोंग यांची तीन वेळा भेट घेतली आहे. सिंगापूर, हनोई आणि उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील डिमिलीटरायझेशन झोनमध्ये. ट्रम्प सर्व प्रयत्न करूनही किमला अण्वस्त्रांवरील त्यांचा आग्रह सोडण्यास भाग पाडू शकले नाहीत.
10 / 11
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, प्योंगयांगने मोठ्या प्रमाणात आर्सेनल गोळा केले आहे. किमबरोबर झालेल्या चर्चेमुळे दक्षिण कोरियासारख्या प्रमुख मित्रांशी संबंध तोडले गेले अशी टीका ट्रम्प यांच्यावर करण्यात येते.
11 / 11
ट्रम्प प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले जॉन बोल्टन यांनी आपल्या संस्मरणात साराने सांगितलेल्या अनुभवाचा उल्लेख केला नाही. तथापि, त्यांनी लिहिले होते की ट्रम्प यांनी किम जोंगशी क्रीडा विषयावर संवाद साधला आणि एक मिंट खाण्यास दिली. ट्रम्प यांचे सहकारी त्यांना किमबरोबर एकटे सोडू इच्छित नव्हते कारण ट्रम्प हानीकारक करारास संमती देतील अशी भीती त्यांना होती असं जॉन बोल्टन यांनी सांगितले.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उनAmericaअमेरिकाnorth koreaउत्तर कोरिया