शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या देशात पादचाऱ्यांवर चिखल उडवल्यास कारचालकांना होते दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 8:44 PM

1 / 6
भरधाव वेगात येत पावसाळ्यात रस्ताशेजारून चालणाऱ्या पादचाऱ्यांवर चिखल, पाणी उडवणारे कारचालक आपल्या देशाच सर्रास दिसतात. पण या जगात असेही काही देश आहेत जिथे असे केल्यास दंडात्मक कारवाई होते. तसेच रस्तेवाहतुकीसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन होते. जाणून घेऊया अशा देशांविषयी.
2 / 6

3 / 6
अशी कृती केल्यास ब्रिटनमध्ये १०० पौंडापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच या कृतीला बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
4 / 6
बाहेरच्या बाजूने अस्वच्छ असल्यास रोमानियामध्ये बेकायदेशीर समजले जाते. नंबर प्लेट, हेड लाइट आणि बॅक लाइट अस्वच्छ असल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.
5 / 6
आइसलँड, ऑस्ट्रिया, जर्मनी, एस्टोनिया आणि फिनलँड या देशात नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान वाहनांना थंडीसाठीचे खास टायर बसवणे अनिवार्य आहे. असे न केल्यास संबंधित कारचालकाला दंड ठोठावला जातो.
6 / 6
रस्त्याच्या मधोमध गाडी चालवणे हा ब्रिटनमध्ये गुन्हा समजला जातो. तसे करणाऱ्या चालकावर दंडात्मक कारवाई होते.
टॅग्स :carकारInternationalआंतरराष्ट्रीय