शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्रम्प यांचा राजेशाही थाट... ७३० कोटींचं बोईंग विमान, सोन्याचे सीट बेल्ट, पाहा काशी आहे त्यांची लक्झरी लाईफ

By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 10:57 AM

1 / 10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावं लागलं. परंतु अमेरिकेच्या राजकारणात त्यांची चर्चा मात्र कायम आहे.
2 / 10
ट्रम्प यांच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे सध्या ते अधिक चर्चेत आहेत. ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्षपद गेलं असलं तरी त्यांचा राजेशाही थाट मात्र कायमच राहणार असल्याचं दिसत आहे.
3 / 10
एकीकडे व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आलिशान घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे ये-जा करण्यासाठी त्यांच्याकडे खासगी जेटदेखील आहे.
4 / 10
डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्याकडे ७३० कोटी रूपयांचं एक खासगी बोईंग ७५७ विमान, Cessna कंपनीचं हाय स्पीड जेट आणि अनेक हेलिकॉप्टर्स आहेत.
5 / 10
२०१६ मध्ये ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोईंग ७५७ या विमानाचा मोठ्या प्रमणात वापरही केला होता.
6 / 10
वृत्तानुसार ट्रम्प यांच्या खासगी बोईंग ७५७ मध्ये एअरफोर्स वन प्रमाणे सुरक्षेच्या सुविधा किंवा ऑपरेशन थिएटर नाही.
7 / 10
परंतु काही जाणकार त्यांचं बोईंग हे एअरफोर्स वन पेक्षाही अधिक उत्तम असल्याचं म्हणतात. एअरफोर्स वन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी वापरलं जाणारं विमान आहे.
8 / 10
ट्रम्प यांच्या खासगी विमानातील सीट बेल्ट हे २४ कॅरेट गोल्डनं तयार केलेले आहेत. तसंच लाऊन्जमध्ये सिनेमा एन्टरटेन्मेंट सिस्टमही लावण्यात आली आहे. याव्यतिरिक्त त्यात बेडरूम, गेस्ट रूम आणि डायनिंग रूमसारख्याही सुविधा आहेत.
9 / 10
ट्रम्प यांच्याकडे Cessna Citation X नावाचं एक हायस्पीड खासगी जेटही आहे. हे जेट ताशी ११३४ किलोमीटर वेगानं जाऊ शकतं. तसंच ५१ हजार फूच उंचीपर्यंत जाण्याची क्षमता यात आहे.
10 / 10
ट्रम्प यांच्याकडे न्यूयॉर्क, फ्लोरिडा, आणि स्कॉटलंडमध्ये Sikorsky S-76 नावाचे तीन हेलिकॉप्टर्सदेखील आहेत.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पairplaneविमानAmericaअमेरिकाUSअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्ष