Have you ever seen such a competition to eat chillies?
मिरची खाण्याची अशी स्पर्धा कधी पाहिली आहे का ? By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 10:46 PM2018-07-10T22:46:40+5:302018-07-10T22:49:38+5:30Join usJoin usNext चीन हा अजबगजब प्रथांसाठी प्रसिद्ध देश आहे. चीनमध्ये झुरळ, पाल आणि इतर प्रकारच्या किड्यामुंग्याही लोक खातात. विशेष म्हणजे चीनमध्ये काही जण आनंदानं मिरच्याही खातात. चीनमध्ये सर्वाधिक मिरच्या खाण्याचा उत्सव साजरा केला जातो. तसेच मिरच्या खाण्यासाठी स्पर्धाही ठेवण्यात येते. सर्वाधिक मिरच्या खाणा-या व्यक्तीला 24 कॅरेट सोन्याचं नाणं देऊन गौरविलं जातं. या नाण्यांचं वजन 3 ग्रॅम असते. स्पर्धा जिंकण्यासाठी 50 मिरच्या खाण्याची अट ठेवण्यात आली आहे. भाग घेणा-या स्पर्धकांना 60 सेकंदांत जास्तीत जास्त मिरच्या खाव्या लागतात. त्यामुळे जो व्यक्ती एका मिनिटांत 50 मिरच्या खाईल, तोच विजेता ठरतो. टॅग्स :चीनchina