Have you ever seen white, red, snow?
सफेद नव्हे, तर लाल रंगाची बर्फवृष्टी कधी पाहिली आहे का ? By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 03:40 PM2018-03-28T15:40:06+5:302018-03-28T15:40:06+5:30Join usJoin usNext गेल्या आठवड्यात रशियात बर्फवृष्टी झाली होती, त्यावेळी लाल ग्रहच जमिनीवर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. रशियातल्या सोची येथे झालेल्या बर्फवृष्टीचा रंग हा सफेद नव्हे, तर लाल दिसत होता. जमिनीवर सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली होती. बर्फवृष्टीचा रंग लाल असल्यानं जणू काही जमिनीवर मंगल ग्रहच अवतरल्याचा भास होत होता. शास्त्रज्ञांच्या मते आफ्रिकेच्या सहारातून उडणारी धूळ ही सायबेरियात पडणा-या बर्फाला जाऊन मिळाल्यानंच या बर्फवृष्टीचा रंग लाल झाला आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भातील लाल बर्फवृष्टीनं व्यापलेल्या मंगल ग्रहासारखे फोटो व्हायरल करण्यात आले होते. टॅग्स :रशियाबर्फवृष्टीrussiaSnowfall