शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जाणून घ्या, ४८ तासांनंतर बदलणार अमेरिकेचा इतिहास; नासा पुन्हा सुरु करणार ‘मानव मिशन’!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:04 AM

1 / 11
अमेरिकन विज्ञानाचा इतिहास ४८ तासांनंतर बदलणार आहे. अमेरिका अंतराळ विज्ञानाच्या जगात एक नवीन पाऊल टाकणार आहे. या प्रसंगाचे साक्षीदार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील वैज्ञानिक बनतील.
2 / 11
अंतराळातील मानव मिशनमुळे ४८ तासानंतरची घटना जगासाठी मैलाचा दगड ठरू शकते. काय आहे अमेरिकेचे मानव मिशन जाणून घेऊया
3 / 11
२१ जुलै २०११ नंतर प्रथमच अमेरिकन पृथ्वीवरील मानव अंतराळाच्या मोहिमेसाठी अवकाशात जाईल. अमेरिकन बनावटीच्या रॉकेटमधून ते जाणार आहेत. म्हणजेच ९ वर्षानंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासा त्यांच्या स्पेस सेंटरमधून स्वदेशी रॉकेटमधून मानवाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवेल. नासाने त्याची तारीख निश्चित केली आहे
4 / 11
२७ मे २०२० रोजी सायंकाळी ४.३३ वाजता नासा अमेरिकन अंतराळवीरांना पृथ्वीवरुन अमेरिकन रॉकेटमध्ये बसवून ठेवून आयएसएसकडे पाठवेल. या मोहिमेतील अंतराळ स्थानकात जाणारे अमेरिकन अंतराळवीरांचे नाव रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले असे आहे.
5 / 11
या दोन्ही अंतराळवीरांना स्पेस-एक्स या अमेरिकन कंपनीच्या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवले जाईल. स्पेस-एक्स ही अमेरिकन उद्योगपती एलोन मस्कची कंपनी आहे. ही कंपनी नासाबरोबर भविष्यातील अनेक अंतराळ मोहिमेवर काम करीत आहे.
6 / 11
स्पेस-एक्स ड्रॅगन यान हे अमेरिकेच्या सर्वात विश्वासार्ह रॉकेट फाल्कन -९ च्या वर बसविण्यात येईल. यानंतर, फाल्कन -९ रॉकेट फ्लोरिडाच्या लाँच कॉम्प्लेक्स ३९ ए पासून प्रक्षेपित केले जाईल. डेमो -२ मिशन असे या मिशनचे नाव आहे. डेमो -१ मिशनमध्ये ड्रॅगन स्पेसक्राफ्टने अंतराळ स्थानकात यशस्वीरित्या वस्तूंची वाहतूक केली होती.
7 / 11
या मोहिमेमध्ये रॉबर्ट बेनकेन हे अंतराळ यानाचे डॉकिंग आणि अनडॉकिंग करुन मार्ग शोधण्याचं कार्य करतील. अंतराळ स्थानक आणि त्याचा मार्ग निश्चित करण्याचा प्रयत्न करतील. बेनकेन यापूर्वी दोनदा अवकाश स्थानकास भेट देऊन गेले आहेत. एकदा २००८ आणि दुसऱ्यांदा २०१० मध्ये. त्यांनी तिनदा स्पेसवॉक केला आहे.
8 / 11
त्याच वेळी डगलस हर्ले ड्रॅगन अंतराळ यानाचे कमांडर असतील. ते प्रक्षेपण, लँडिंग आणि रिकवरीची जबाबदारी पार पाडतील. डगलस २००९ आणि २०११ मध्ये अंतराळ स्थानकात गेले होते. व्यवसायाने ते सिव्हिल इंजिनियर होते त्यानंतर २००० मध्ये ते नासाशी जोडले गेले. यापूर्वी यूएस मरीन कॉर्प्समध्ये लढाऊ पायलट होते.
9 / 11
मे महिन्यात सुरू झालेल्या मोहिमेनंतर हे दोन्ही अंतराळवीर ११० दिवस अंतराळ स्थानकात थांबतील. स्पेस-एक्स ड्रॅगन कॅप्सूल एका वेळी २१० दिवस अवकाशात वेळ घालवू शकतो. त्यानंतर त्याला दुरुस्तीसाठी परत पृथ्वीवर यावे लागेल.
10 / 11
९ वर्षांनंतर, अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आपला व्यावसायिक क्रू कार्यक्रम पुन्हा सुरू करीत आहे. या मोहिमेच्या यशानंतर अमेरिकेला त्यांचे अंतराळवीर अंतराळात पाठविण्यासाठी रशिया आणि युरोपियन देशांकडे जाण्याची गरज भासणार नाही.
11 / 11
२७ जुलै २०११ रोजी नासाने आपला सर्वात यशस्वी स्पेस शटल प्रोग्राम बंद केला. त्याच दिवशी स्पेस शटल अटलांटिस पृथ्वीवर परत आला होता. अंतराळ शटल प्रोग्रामद्वारे अंतराळ स्थानकात १३५ उड्डाणे करण्यात आली. ३० वर्ष चाललेल्या या कार्यक्रमात ३०० हून अधिक अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यात आले होते.
टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिका