hotel arbez one hotel two countries
दोन देशांच्या सीमेवरील एक अनोखं हॉटेल By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:49 PM2019-05-07T13:49:14+5:302019-05-07T13:55:39+5:30Join usJoin usNext तुम्ही कधी असं हॉटेल पाहिलं आहात का? जे दोन देशात विभागलं आहे. यावर तुमचाही विश्वास बसला नसेल. चला तर मग जाणून येऊया या हॉटेलबाबत... अरबेज असं या हॉटेलचं नाव आहे. अरबेज फ्रांसको सुसी असंही म्हटलं जातय. हे हॉटेल फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सीमेवर आहे. या दोन देशांनी ते आपसात वाटून घेतलं आहे. त्यामुळं अरबेज हॉटेलची नेहमी चर्चा होत असते. कारण, हॉटेलची विभागणी केल्यामुळं याठिकाणी राहणाऱ्या ग्राहकाचं डोकं फ्रान्समध्ये तर पाय स्वित्झर्लंडमध्ये अशी परिस्थिती होते. यात आणखी एक म्हणजे हॉटेल्सच्या खोल्या जास्तकरुन स्वित्झर्लंडच्या हद्दीत आहेत. तर फ्रान्सच्या हद्दीत जास्त वॉशरूम्स आहेत. डायनिंग हॉल मात्र बरोबर विभागला आहे. विशेष, म्हणजे दोन्ही देशांच्या संस्कृतींची झलक या ठिकाणी पाहायला मिळते.टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सहॉटेलTravel Tipshotel