Joe Biden's team includes more than 20 people of Indian descent
जो बायडेन यांच्या या टीममध्ये २० हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींना स्थान By बाळकृष्ण परब | Published: November 13, 2020 12:12 PM1 / 5अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया आता जवळपास आटोपत आली आहे. आता अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा म्हणून कमला हॅरिस हे शपथ घेतील हे आथा निश्चित झाली आहे. यादरम्यान, अमेरिकेत सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये जो बायडेन यांनी आपल्या ट्रांझिशन टीममध्ये भारतीय वंशाच्या २० व्यक्तींना स्थान दिले आहे. 2 / 5अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपली एक नवी रिव्ह्यू टीम तयार केली आहे. याला ट्रांझिशन टीम असेही म्हणतात. या माध्यमातून निवडणूक जिंकल्यानंतर २० जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर बायडेन कार्यभार सांभाळतील . या टीममध्ये एकूण ५०० जणांचा समावेश आहे. 3 / 5जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या तीन व्यक्तींना आपल्या रिव्ह्यू टीमच्या लीडर्समध्ये समाविष्ट केले आहे. तर अन्य २० जणांना या टीममध्ये समाविष्ट केले आहे. हे सर्व भारतीय वंशांच्या व्यक्ती अमेरिकेतील सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतील. 4 / 5बायडेन यांच्या या टीममध्ये जे प्रमुख तीन भारतीय वंशाचे चेहरे आहेत त्यांच्यामध्ये राहुल गुप्ता, अरुण मजुमदार आणि किरण आहुजा यांचा समावेश आहे. याशिवास अतमन त्रिवेदी, अनीश चोप्रा, अऱुण वेंकटरमण, राज नायक, शीतल शाह यांच्यासारख्या अन्य २० जणांच्या टीममध्ये आहेत. 5 / 5यापूर्वी बायडेन यांचे प्रशासनसुद्धा जनतेत चर्चेचा विषय बनला होता. तसेच बायडेन यांच्या टीममध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तींची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असेही मानण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काही तासांनंतर बायडेन यांच्या गटाकडून सांगण्यात आले की, बायडेन सरकारचे पहिले प्राधान्य हे कोरोनाला रोखण्याचे असेल. बायडेन यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करणार आहेत. मात्र सध्या या टीमची जबाबदारी डॉ. विवेक मूर्ती यांच्याकडे देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications