Meet India's 100-Year-Old Puppet On World Puppetry Day
रामदास पाध्येंच्या ‘अर्धवटरावां’चा परदेशातही डंका By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 3:13 PM1 / 5बोलक्या बाहुल्यांनी भारताचे नाव जगभरात पोहोचविलेल्या शब्दभ्रमकार रामदास पाध्येंच्या, ‘अर्धवटराव’ या तरुण बाहुल्याचे सध्या परेदशी नागरिक प्रचंड फॅन झाले आहेत. गेल्या वर्षी अर्धवटरावांनी वयाची सेंच्युरी गाठली.त्याचे जोरदार सेलिब्रेशनही मुंबईत करण्यात आले. 2 / 5अर्धवटराव आणि त्याची जोडीदार आवडाबाई या बाहुल्यांना भारतीयांनी तर या आधीच डोक्यावर घेतलेय. 3 / 5अर्धवटरावांनी वयाची सेंच्युरी गाठल्यानंतर, रामदास पाध्ये आणि कुटुंबीयांनी अर्धवटरावांची महती साऱ्या जगाला कळावी, यासाठी ‘कॅरी आॅन पाध्ये’ या कार्यक्रमाचे प्रयोग परदेशात सादर करण्याचा निर्णय घेतला. परदेशातही अर्धवटरावांना तुफान प्रतिसाद मिळाला.4 / 5गप्पा मारताना मध्येच डोळा मारणे, बोलता-बोलता आपली मान गरागरा फिरविणे, आपल्या बोलण्याने समोरच्याची टोपी उडविण्याच्या अर्धवटरावांच्या अनोख्या स्टाईलने भारतीयांसोबतच परदेशी प्रेक्षकांनाही खळखळून हसविले. 5 / 5 मलेशिया, चीनमधल्या पपेट फेस्टिव्हलमध्ये पाध्येंनी भाग घेतला आणि आपल्या भारतीय बाहुल्यांना जगाच्या व्यासपीठावर एक मानाचे स्थान निर्माण करून दिले. आणखी वाचा Subscribe to Notifications