most influential and powerful photographs
पॉवरफुल फोटोज! 'या' फोटोंनी जग भेदरलं, शहारलं, हेलावलं By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 4:40 PM1 / 72015 मध्ये सीरियात इसिसविरोधात संघर्ष सुरू असताना अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडला. अनेकांनी युरोपीयन देशांमध्ये समुद्रमार्गे पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समुद्राकाठी एका सीरियन मुलाचा मृतदेह आढळून आला. तीन वर्षांच्या आयलान कुर्दीचा निष्प्राण देह समुद्राबाहेर वाहून आला होता. हा फोटो पाहून अनेकांचं काळीज हेलावलं.2 / 7सीरियातील यादवीमुळे हजारो लोकांनी देशांतर केलं. त्यातील अनेकांनी युरोपात आसरा घेतलं. यातलंच एक दाम्पत्य हंगेरीतल्या बुडापेस्टमधल्या केलेटी रेल्वे स्थानकाजवळच्या तंबूत किस करताना. 3 / 7नॅशनल जिओग्राफिकचे फोटोग्राफर स्टिव्ह मॅक्कुरी यांनी अफगाणिस्तानातल्या शरबत गुला नावाच्या मुलीचा टिपलेला हा फोटो. अतिशय सर्वसामान्य असलेली ही मुलगी या फोटोमुळे, तिच्या डोळ्यातील भावांमुळे असामान्य बनली. या फोटो जगभरात गाजला.4 / 7सुदानमध्ये दुष्काळ पडलेला असताना काढण्यात आलेला हा फोटो. काहीच खायला न मिळाल्यानं मरणासन्न अवस्थेत असलेलं मूल आणि त्याच्या मरणाची वाट पाहात असलेलं गिधाड केव्हीन कार्टर यांनी टिपलं. त्यांच्या या फोटोला पुलित्झर पुरस्कार मिळाला.5 / 7रशियाच्या चेचेन्यामध्ये एक जवान पियानो वाजवत असताना टिपण्यात आलेला फोटो. 1994 मध्ये हा फोटो टिपण्यात आला होता. 6 / 7अवघड ऑपरेशन केल्यानंतर रुग्णाच्या बाजूला बसलेला डॉक्टर आणि खोलीच्या कोपऱ्यात दमलेला त्याचा सहकारी.7 / 71993 च्या बॉम्बस्फोटात अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या झंजीर कुत्र्याचा 2000 साली मृत्यू झाला. 1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट सुरू असताना झंजीरनं अनेक डिटोनेटर्स, स्फोटकं, हँड ग्रेनेड शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications