North Korea tells WHO it has detected no virus cases report shown covid 19 world
Coronavirus : देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; उत्तर कोरियाची WHO ला माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 1:35 PM1 / 12Coronavirus In North Korea Kim Jong Un : कोरोनाच्या महासाथीनं जगभरात हाहाकार माजवला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करत आहे. 2 / 12परंतु दुसरीकडे उत्तर कोरियानं मात्र मोठा दावा करत आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याचा दावा केला आहे. 3 / 12उत्तर कोरियानं जागतिक आरोग्य संघटनेला (World Health Organization) यासंदर्भातील माहिती दिली आहे. 4 / 12१० जून ते ३० जूनपर्यंत ३० हजार नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. परंतु देशात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याचं उत्तर कोरियानं स्पष्ट केलं आहे.5 / 12उत्तर कोरियाच्या आकडेवारीनुसार ४ जून ते १० जूनदरम्यान ७३३ लोकांची तापासणी करण्यात आली. यापैकी १४९ लोकांना इन्फ्ल्यूएन्झासारखे आजार किंवा श्वसनाच्या आजाराची समस्या होती, असं जागतिक आरोग्य संघटनेनं एका सर्व्हिलिअन्स रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 6 / 12दरम्यान, देशात एकही कोरोना रुग्ण नाही या उत्तर कोरियाच्या दाव्यावरही शंका असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 7 / 12दरम्यान उत्तर कोरियाची आरोग्य व्यवस्था चांगली नाही, याशिवाय आर्थिक जीवनरेषा मानली जाणारी त्याची सीमाही चीनसोबत लागून आहे, असंही त्यात म्हटलं आहे.8 / 12उत्तर कोरियानं आपल्या प्रयत्नांना राष्ट्रीय अस्तित्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय पर्यटकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. 9 / 12याशिवाय डिप्लोमॅट्सनाही भारताच्या बाहेर पाठवलं आहे. तर दुसरीकडे सीमेवरी ये-जा आणि व्यापार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 10 / 12परंतु उत्तर कोरियात असलेल्या या लॉकडाऊनसारख्या स्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण आला आहे. 11 / 12याशिवाय गेल्या अनेक दशकांपासून देशातील अण्विक कार्यक्रम आणि गैरव्यवस्थापनाचा ठपका ठेवत अमेरिकेनंही निर्बंध लादले होते. त्याचाही देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. 12 / 12उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांना मोठ्या कालावधीपुरतं लॉकडाऊनसाठी तयार राहण्यास सांगितलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications