pigg o stat method of x-ray of babies photos went viral
बापरे, लहान मुलांचा एक्स रे असा काढतात By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:58 PM2019-05-08T12:58:46+5:302019-05-08T13:03:40+5:30Join usJoin usNext सोशल मिडीया चॅंलेजमध्ये लोकं नेहमी अजब-गजब कारनामे करत असताना पाहायला मिळतात. त्यात काही कृत्य तर माणुसकीला काळीमा फासणारी असतात. सोशल मिडीयाच्या क्रेझमध्ये लोकांनी लहान मुलांनाही सोडलं नाही. अशाचप्रकारे सोशल मिडीयावर लहान मुलांचे काही फोटो व्हायरल होतायेत. जे फोटो पाहून तुम्हाला राग अनावर होईल. मात्र ज्यावेळी याचं खरं कारण तुम्हाला समजेल तेव्हा पोट धरून हसायला लागाल. या मुलांना पारदर्शी असलेल्या एक्स रे ट्युबमध्ये टाकण्यात आलं आहे. त्यांची स्थिती पाहून तुम्ही हसाल. या मशीनला Pigg O Stat या नावाने ओळखलं जातं. सन 1960 मध्ये पहिल्यांदा बालरोगतज्ज्ञांनी या मशीनला पसंती दिली होती. या मशीनचा वापर लहान मुलांचे एक्स रे काढण्यासाठी वापरलं जातं. माऊजी मान या ट्विटर युजरने या लहान मुलांचे फोटो ट्विट केलेत. त्यानंतर सोशल मिडीयात हे फोटो व्हायरल झालेत. लहान मुलांचा एक्स रे नेमका कसा काढला जातो ते यानिमित्ताने समजलं असल्याचं माऊजीने सांगितले. आत्तापर्यंत 1 लाख 40 हजार पेक्षा अधिक लोकांनी या ट्विटला रिट्विट केलं आहे.टॅग्स :सोशल मीडियाट्विटरSocial MediaTwitter