Singapore airlines boeing 787-10 dreamliner
स्वप्नवत... हवेतील 'फाइव्ह स्टार' हॉटेल पाहिलंत का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 03:08 PM2018-03-29T15:08:08+5:302018-03-29T15:13:49+5:30Join usJoin usNext सिंगापूर एअरलाईन्सच्या (SIA) ताफ्यात जगातील पहिले बोईंग 787-10 दाखल झाले. नॉर्थ चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना येथील कारखान्यात याची निर्मिती करण्यात आली. आपल्या ताफ्यात बोईंगची नविनतम विमाने दाखल करून घेणारी एसआयए ही जगातील पहिली हवाई सेवा आहे. पुढील महिन्यापासून व्यावसायिक सेवा देण्यासाठी ती सज्ज झाली आहे. 787-10 मध्ये एसआयएच्या नव्या रिजनल केबिन उत्पादनांचा समावेश असेल. यामध्ये 2 वर्गाच्या श्रेणीत मिळून एकूण 337 सीट्स आहेत. यामधील बिझनेस क्लासची 36 सीट्स आणि इकोनॉमी क्लासची 301 सीट्स आहेत. वजनाला हलक्या असणाऱ्या संमिश्र साहित्याचा वापर करून तयार करण्यात आलेले 68 मीटर लांबीचे 787-10 हे बोईंगच्या ड्रीमलायनर विमान श्रेणीतील सर्वात जास्त लांबीचे विमान आहे. याची कार्यक्षमता ही अद्वितीय असून यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. या विमानामध्ये आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रकाश योजना करण्याची सुविधा विमान प्रवाशांना मिळेल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रकाश कमी-जास्त करता येऊ शकणाऱ्या मोठ्या खिडक्या, स्वच्छ हवा आणि शांत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रवासी घेऊ शकतील. नॉर्थ चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना येथील कारखान्यात याची निर्मिती करण्यात आली.टॅग्स :सोशल व्हायरलSocial Viral