Surprise! There is no one village in this country
आश्चर्यच! या देशांमध्ये नाही एकही गाव By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 8:47 PM1 / 12गाव-खेडी, छोटीमोठी शहरे मिळून देश बनतो. साधेपणा जपणाऱ्या गावांशिवाय देशाला पूर्णत्व येऊ शकत नाही. मात्र या जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत जिथे एकही गाव नाही. जाणून घेऊया अशा देशांविषयी. 2 / 12केवळ 37 हजार 308 लोकसंख्या असलेल्या मोनॅको या शहरवजा देशात एकही खेडेगाव नाही. 3 / 12नाऊरू या छोट्याशा बेटावर वसलेल्या देशात एकही गाव नाही. या देशाची लोकसंख्या केवळ 10 हजार 084 एवढी आहे. 4 / 12श्रीमंती आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंगापूरविषयी तुम्ही ऐकलंच असेल. संपूर्ण शहरीकरण झालेल्या सिंगापूरमध्येही एकही गाव नाही. सिंगापूरची लोकसंख्या 56 लाख 07 हजार 003 एवढी आहे. 5 / 12ख्रिस्ती धर्मियांचे पवित्र ठिकाणी आणि पोपचे निवासस्थान असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये एकही गाव नाही. या देशाची लोकसंख्या केवळ १ हजार एवढीच आहे. 6 / 12अंगुइला या देशात एकही गाव आढळत नाही. येथील लोकसंख्या केवळ 14,764 एवढी आहे. 7 / 12अनेक बेटांचा मिळून बनलेल्या बर्मुडामध्येही गावांचे अस्तित्व नाही. येथील लोकसंख्या केवळ 63,779 एवढीच आहे. 8 / 12 60 हजार 765 लोकसंख्या असलेल्या कायमान आयलँड्समध्येही गाव नाहीत. 9 / 12जिब्राल्टर हासुद्धा मर्यादित विस्तार असलेला आणि पूर्ण शहरीकरण असलेला देश आहे. त्याची लोकसंख्या 32,194 एवढी आहे. 10 / 12हाँगकाँग हा देशसुद्धा तेथील सुबत्तेसाठी प्रसिद्ध आहे. या देशात एकही गाव नाही. येथील लोकसंख्या 74 लाख 09 हजार 80011 / 12मकाओ या देशामध्येसुद्धा एकही गाव नाही. येथील लोकसंख्या 6 लाख 50 हजार 900 एवढी आहे. 12 / 1233 हजार 609 लोकसंख्या असलेल्या सिंट मार्टेन या देशातही एकही गाव नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications