The temperature of this place in the world is above 55 degrees
जगातल्या 'या' ठिकाणी पारा पोहोचतो 55 डिग्रीच्या वर By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:15 PM2019-05-06T18:15:16+5:302019-05-06T18:18:27+5:30Join usJoin usNext भारतात यंदा उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. आकाशातून अक्षरशः आगीचे गोळे पडत असल्याचा भास होतोय. त्यामुळे दुपारच्या वेळी घरातून बाहेर निघणंही कठीण झालंय. परंतु या धरतीवर अशाही काही जागा आहेत, तिथे या दिवसांतून बाहेर पडणं अशक्यप्राय आहे. इराणमधल्या दश्त-ए-लूत या ठिकाणाला जगभरातलं सर्वात उष्ण मानलं जातं. नासानं 2005मध्ये इथलं तापमान 70.7 डिग्री सेल्सियस नोंदवलं होतं. 2004, 2007 आणि 2009ला या ठिकाणाला धरतीवरचं सर्वात हॉट ठिकाण मानलं गेलं आहे. चिलीतल्या अटाकामा डेजर्टबरोबरच दश्त-ए-लूट हे ठिकाण जगभरात सर्वात शांत समजलं गेलं आहे. अमेरिकेतल्या डेथ व्हॅलीमध्ये पाऊस फारच कमी प्रमाणात पडतो, इथे पाण्याचं नामोनिशाण पाहायला मिळत नाही. जर कोठे पाणी मिळाले, तर तेसुद्धा खारं असतं. 1913मध्ये जेव्हा इथलं तापमान मोजण्यात आलं, तेव्हा ते 56.7 डिग्री सेल्सियस होतं. त्यामुळेच या ठिकाणाचं नाव देशातील उष्ण ठिकाणांमध्ये घेतलं आहे. सूडानमधल्या वदी हाल्फा हे शहरही नुबियाच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. जून इथला सर्वात उष्ण महिना असतो. या दरम्यान तापमान 41 डिग्री सेल्सियस असतं. 1967मध्ये सर्वात उष्णतेच्या दिवसाची इथे नोंद झाली होती. लीबियातल्या अजीजियाहची राजधानी त्रिपोलीपासून 25 मैल अंतरावर स्थित आहे. या ठिकाणाला जगातील सर्वात उष्ण ठिकाण समजलं गेलं आहे. 1922मध्ये इथलं तापमान 58 डिग्री सेल्सियस होतं. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips