These countries changed their capital
या देशांनी बदलली आपली राजधानी By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:24 PM2019-05-14T13:24:02+5:302019-05-14T13:50:21+5:30Join usJoin usNext प्रत्येक देशाची राजधानी ही त्या देशाची ओळख असते. या राजधानीमधून देशाचा संपूर्ण कारभार चालत असतो त्यामुळे राजधानी हे संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करत असते. या जगात असे अनेक देश आहेत ज्यांनी काळाच्या ओघात आपली राजधानी बदलली आहे. अशा देशांचा घेतलेला हा आढावा. नायजेरिया - आफ्रिका खंडातील नायजेरिया या देशाची लागोस ही 1991 पर्यंत राजधानी होती. मात्र नंतर वाढती उष्णता आणि जागेच्या टंचाईमुळे अबुजा येथे नायजेरियाची राजधानी स्थलांतरीत करण्यात आली आहे. ब्राझील - रियो दि जानिरो ही एकेकाळी ब्राझीलची राजधानी होती. मात्र नागरी समस्यांमुळे ब्राझिलिया या विकसित केलेल्या शहरात ब्राझीलची राजधानी हलवण्यात आली. म्यानमार - पूर्वी ब्रह्मदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्यानमारची रंगून ही राजधानी होती. मात्र 2005 मध्ये नेपिदा या शहरामध्ये राजधानीचे स्थलांतर करण्यात आले. मात्र असे असले तरी रंगून हे शहर अजूनही म्यानमारमधील प्रमुक आर्थिक आणि राजकीय शहर आहे. पाकिस्तान - फाळणी झाल्यानंतर 1947 मध्ये कराची या शहराला पाकिस्तानच्या राजधानीचा मान मिळाला. मात्र 1959 मध्ये पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे स्थलांतरीत करण्यात आली. इस्लामाबाद हे शहर पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपासून जवळ आहे. कझाकिस्तान - अलमाटी ही अनेक वर्षे कझाकिस्तानची राजधानी होती. मात्र 1997 मध्ये अस्ताना शहराला कझाकिस्तानची राजधानी घोषित करण्यात आले. आता या शहराचे नाव बदलून नूर सुल्तान असे करण्यात आले आहे. रशिया - पूर्वी सेंट पीटर्सबर्ग ही रशियाची राजधानी होती. मात्र 1997 च्या क्रांतीनंतर मॉस्को ही रशियाची राजधानी ठरली. जर्मनी - दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे पूर्व आणि पश्चिम जर्मनी असे विभाजन झाले होते. त्यावेळी बर्लिन ही पूर्व जर्मनीची तर बॉन पश्चिम जर्मनीची राजधानी ठरले. मात्र 1990 मध्ये झालेल्या एकीकरणानंतर पुन्हा बर्लिनला संपूर्ण जर्मनीच्या राजधानीचा मान मिळाला. भारत - फार पूर्वीपासून दिल्ली हे भारतातील सत्ताकेंद्र राहिले आहे. मात्र ब्रिटिश सत्तेच्या सुरुवातीच्या काळात कोलकाता या शहराला देशाची राजधानी बनवण्यात आले होते. पुढे 1911 मध्ये ब्रिटीश राजे पंचम जॉर्ज यांनी भारताची राजधानी दिल्लीत स्थलांतरीत केले. टॅग्स :आंतरराष्ट्रीयजर्मनीरशियाम्यानमारभारतInternationalGermanyrussiaMyanmarIndia