these english words are considered improper in british royal families dictionary
ब्रिटनच्या राजघराण्यात चुकूनही उच्चारले जात नाहीत इंग्रजीतले हे 5 शब्द By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 06:32 PM2019-06-17T18:32:45+5:302019-06-17T18:36:45+5:30Join usJoin usNext ब्रिटनमधील राजघराण्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. त्यांचं राहणीमान, खाण्या-पिण्याच्या पद्धती, बसण्या-उठण्याची एक वेगळीच शैली असते. परंतु या राजघराण्यातील व्यक्ती असेही काही शब्द आहेत जे कधीच उच्चारत नाहीत. टी टाइम हा शब्दही ते कधी उच्चारत नाहीत. आई-वडिलांना बऱ्याच नावानं हा मारण्याची प्रथा असते. काही जण आई-वडिलांना प्रेमानं मॉम-डॅड म्हणतात, पण ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्ती आई-वडिलांना मम्मी आणि डॅडीच म्हणतात. मग ते वयानं किती मोठे का असेनात. ब्रिटनच्या राजघराण्यात टॉयलेट शब्दालाही खालच्या दर्जाचं समजलं जातं, त्याऐवजी ते लू (Loo) किंवा लावटरी (Lavatory) हे शब्द वापरतात. चूक झाल्यास इंग्रजीमध्ये Pardon बोलण्याची अनेकांना सवय असते. परंतु या राजघराण्यात Pardon या शब्दाऐवजी Sorry शब्द उच्चारला जातो. रॉयल फॅमिलीमध्ये परफ्युम शब्द उच्चारत नाही, तर सेंट शब्द वापरला जातो.