शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रिटनच्या राजघराण्यात चुकूनही उच्चारले जात नाहीत इंग्रजीतले हे 5 शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 6:32 PM

1 / 5
ब्रिटनमधील राजघराण्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. त्यांचं राहणीमान, खाण्या-पिण्याच्या पद्धती, बसण्या-उठण्याची एक वेगळीच शैली असते. परंतु या राजघराण्यातील व्यक्ती असेही काही शब्द आहेत जे कधीच उच्चारत नाहीत. टी टाइम हा शब्दही ते कधी उच्चारत नाहीत.
2 / 5
आई-वडिलांना बऱ्याच नावानं हा मारण्याची प्रथा असते. काही जण आई-वडिलांना प्रेमानं मॉम-डॅड म्हणतात, पण ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्ती आई-वडिलांना मम्मी आणि डॅडीच म्हणतात. मग ते वयानं किती मोठे का असेनात.
3 / 5
ब्रिटनच्या राजघराण्यात टॉयलेट शब्दालाही खालच्या दर्जाचं समजलं जातं, त्याऐवजी ते लू (Loo) किंवा लावटरी (Lavatory) हे शब्द वापरतात.
4 / 5
चूक झाल्यास इंग्रजीमध्ये Pardon बोलण्याची अनेकांना सवय असते. परंतु या राजघराण्यात Pardon या शब्दाऐवजी Sorry शब्द उच्चारला जातो.
5 / 5
रॉयल फॅमिलीमध्ये परफ्युम शब्द उच्चारत नाही, तर सेंट शब्द वापरला जातो.