These 'Leaders' are the highest paid salaries in the world
जगातल्या 'या' नेत्यांना मिळतो सर्वाधिक पगार By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 11:08 PM2018-03-27T23:08:22+5:302018-03-27T23:08:22+5:30Join usJoin usNext अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगभरात सर्वाधिक पगार आहे. त्यांना वर्षाकाठी 4 लाख डॉलर म्हणजेच 2.5 कोटी रुपये वेतन मिळतं. तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे जगात सर्वाधिक पगार घेणा-यांच्या यादीत दुस-या स्थानी आहेत. त्यांना दर वर्षाला 1.7 कोटी रुपये पगार मिळतो. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केल यांना वर्षाला 1.6 कोटी रुपये पगार मिळतो. तर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मँक्रो हे यादीत चौथ्या स्थानी आहेत. त्यांना वर्षाकाठी 1.3 कोटी रुपये पगार मिळतो. युनायडेट किंग्डमच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना भारतीय चलनानुसार 1.2 कोटी रुपये पगार आहे. तर जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांना वर्षाला 1.2 कोटी रुपये वेतन मिळते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना यादीत सातवं स्थान देण्यात आलं आहे. त्यांना वर्षाला 96 लाख पगार मिळतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना वर्षाला 13 लाख रुपये पगार मिळतो. टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पव्लादिमीर पुतिनDonald TrumpVladimir Putin