शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कुलभूषण जाधव : आई-मुलाच्या भेटीत पाकिस्तानची भिंत! काही अंतरावर असूनही मायेचा स्पर्श नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 6:55 PM

1 / 9
पाकिस्तानात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी आज(दि.25) त्यांची आई आणि पत्नीची भेट घेतली. तब्बल दीड वर्षांनंतर त्यांची कुटुंबीयांसोबत भेट झाली.
2 / 9
40 मिनिटांच्या या भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी लगेचच व्यावसायिक विमानाने भारताकडे रवाना झाले.
3 / 9
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. काचेच्या एका बाजूला कुलभूषण जाधव बसले होते तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती.
4 / 9
ते एकमेकांना दिसत होते पण काही अंतरावर असूनही त्यांना एकमेकांना मायेचा स्पर्श करता आला नाही. त्यामुळे थेट संवाद न होता इंटरकॉमच्या माध्यमातूनच त्यांच्यात बोलणं झालं.
5 / 9
तब्बल दीड वर्षानंतर झालेल्या या भेटीदरम्यान काचेची भिंत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून पाकिस्तानवर टीका झाली
6 / 9
या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या भेटी दरम्यान काचेची भिंत का होती असा प्रश्न पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांना विचारण्यात आला.
7 / 9
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काचेची भिंत ठेवण्यात आली होती असं ते म्हणाले. कुलभूषण जाधवची भेट घेता येईल पण भेटीदरम्यान सुरक्षेची काळजी घेतली जाईल असं आम्ही भारताला यापूर्वीच कळवलं होतं असं स्पष्टीकरण मोहम्मद फैसल यांनी दिलं आहे.
8 / 9
नियोजित अर्ध्या तासाच्या भेटीचा अवधी ऐनवेळी वाढल्याचीही माहिती मिळते आहे. पाकिस्तानातील जिओ न्यूजच्या माहितीनुसार, कुलभूषण जाधव यांची त्यांची आई आणि पत्नीशी सुमारे 40 मिनिटं भेट झाली. त्यामुळे आधी 30 मिनिटं ठरलेली भेट, 10 मिनिटांनी वाढली.
9 / 9
कुलभूषण जाधव, त्यांची आई आणि पत्नी, यांच्यासोबतच पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त जे पी सिंह इत्यादी उपस्थित होते. किंबहुना, कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या संपूर्ण प्रवासात जे पी सिंह सोबत होते.
टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान