When 10 thousand innocent people were crushed under tanks in China...
जेव्हा 10 हजार निष्पाप लोकांना चीनने रणगाड्यांखाली चिरडले होते... By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 11:34 AM2019-06-04T11:34:33+5:302019-06-04T11:41:11+5:30Join usJoin usNext इंग्रजांच्या शासनकाळात जालियनवाला बाग हत्याकांड आजही भारतीयांच्या अंगावर शहारे आणतं. मात्र, चीनमध्ये असेही एक हत्याकांड झाले होते ज्यामध्ये 10000 लोक ठार झाले होते. आज 4 जूनला या हत्याकांडाला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. तीस वर्षांपूर्वी चीनच्या तियानमेन चौकात हा नरसंहार झाला होता. जगभरात मानवाधिकारांवर चर्चा होत असताना या काळात चीनमध्ये काही बदल झाल्याचे दिसून येत नाही. आज 30 व्या वर्षी बिजिंगच्या चौकाचौकांमध्ये सरकारने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. तर तियानमेन चौकात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच हा चौक कोणत्याही प्रकारे स्मृतीस्थळ होऊ नये यासाठी चीनचे सैन्यही प्रयत्नशील असते. सामाजिक कार्यकर्त्यांची गेल्या आठवड्यापासूनच धरपकड सुरु झाली असून प्रत्येक पर्यटकाचीही कसून चौकशी केली जात आहे. चीनच्या क्रूरतेने 1989 मध्ये कळस गाठला होता. हा दिवस चीनच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. 4 जून 1989 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उदारमतवादी नेता हू याओबँग यांच्या कथित हत्येविरोधात हजारो विद्यार्थी बिजिंगच्या तियानमेन चौकात आंदोलन करत होते. असे म्हणतात की, तीन आणि 4 जूनमधील रात्री लोकशाहीच्या समर्थकांवर चीनच्या कम्युनिस्ट सरकारने एकढे अत्याचार केले की चीनसाठी हा काऴा अध्याय होता. चीनच्या सेनेने निर्दोष लोकांवर गोळ्या झाडल्या तसेच त्यांच्यावर रणगाडे चालविले आणि चिरडून ठार केले. सरकारी अहवालानुसार शेकडो लोक मारले गेले तर ब्रिटिश गुप्तहेर खात्यानुसार या नरसंहारात 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. जगभरात या तियानमेन चौक हत्याकांडावरून टीका होत असताना चीनने ही कारवाई योग्यच असल्याचे म्हटले आहे. चीनचे तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी सरकारची ही योग्य नीती असल्याचे म्हटले होते. जनरल वेई फेंगहे यांनी सिंगापूरमधील सुरक्षा परिषदेमध्ये या घटनेला राजनैतिक अस्थिरता असे संबोधले होते. तत्कालीन सरकारने संकट टाळण्यासाठी उचललेले पाऊल योग्यच होते. आज 4 जूनला या हत्याकांडाला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. टॅग्स :चीनchina