कुठे उटली ट्रेन तर कुठे छोटी गाडी, पाहा जगभरातील अजब सार्वजनिक वाहतूक सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 09:10 PM2018-06-06T21:10:50+5:302018-06-06T21:10:50+5:30

जगभरातील विविध देशात सार्वजनिक वाहतुकीसाठी विविध साधनांचा वापर केला जातो. या छायाचित्रामध्ये कंबोडियामधील बांबू ट्रेन दिसत आहे. ही ट्रेन बांबूचे तुकडे आणि एका छोट्या इंजिनाच्या मदतीने चालवली जाते.

दोन प्रवाशांना प्रवास करता येईल असे टोबोगान हे वाहन पोर्तुगालमध्ये प्रसिद्ध आहे.

फिलिफाइन्समध्ये हबल हबल नावाची दुचाकी प्रसिद्ध आहे. या दुचाकीवरून सुमारे 11 लोक प्रवास करू शकतात.

थायलंडमध्ये टूक टूक ही गाडी प्रसिद्ध आहे.

जर्मनीमध्ये उलटी चालणारी हँगिंग ट्रेन प्रसिद्ध आहे.

टॅग्स :बातम्याnews