this 90 year old is giving major old age goals
नव्वदीतल्या या आजींचा उत्साह तरुणांनाही लाजवेल! By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 2:44 PM1 / 7वय हा फक्त आकडा आहे, असं म्हणतात. आयुष्य आपल्यापासून बालपण हिरावून घेऊ शकतं. मात्र एखाद्या व्यक्तीनं मनात बालपण जपलं असेल, तर त्याचं बालपण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 2 / 7आयुष्य मजेत जगणाऱ्यांपैकी एक म्हणजे जपानमधील या आजी. 90 वर्षांच्या किमिको निशिमोटो सध्या आयुष्याची सेकंड इनिंग एन्जॉय करत आहेत. 3 / 7शरीरानं थकल्या असल्या तरी किमिको मनानं अतिशय तरुण आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या अगदी समरसून जगत आहेत. 4 / 7इतर वृद्धांसारखं आला दिवस ढकलून जगणं किमिको यांना मान्य नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस त्या आनंदानं जगतात. 5 / 7सध्या किमिको यांच्या विविध वेशभूषेतील कपड्यांमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 6 / 7विशेष म्हणजे टोकियोमध्ये या फोटोंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. आयुष्याचा उत्तरार्धही अतिशय मनमोकळेपणानं जगणाऱ्या किमिको यांचे फोटो पाहायला लोकांना मोठी गर्दी केली होती. 7 / 7किमिको यांचे फोटो अनेकार्थांनी लक्षवेधी आहेत. त्यांच्या या फोटोंमुळे अनेकांना जगण्याची नवी उमेद आणि उर्जा दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications