amazing photos of isolated tribes
'या' आदिवासी जमाती राहतात जगापासून दूर By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 02:38 PM2019-01-14T14:38:20+5:302019-01-14T14:44:30+5:30Join usJoin usNext ब्रिटिश फोटोग्राफर जिमी नेल्सन यांनी संपूर्ण जगभर भ्रमंती करुन अनेक आदिवासी जमातींचे फोटो टिपले आहेत. हे फोटो अतिशय सुंदर आहेत. या फोटोंसाठी नेल्सन यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यातलाच हा एक फोटो. मार्ग्युसस बेटावर हा फोटो टिपण्यात आला आहे. हा फोटो पाहून तुम्हाला चिनी चित्रपटाची आठवण होईल. फोटोतील ही जमात चीनच्या जंगलात आढळते. हा फोटो भूतानमधील एका आदिवासी जमातीचा आहे. ही मंडळी चेहऱ्यावर कायम मुखवटा घालतात. फोटोत दिसणारी ही जमात सम्बुरु नावानं ओळखली जाते. ही केनियामध्ये आढळून येते. ही जमात भारतातील आहे. लडाखमध्ये हा फोटो टिपण्यात आला आहे. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमाती प्राणी पक्षांशी चांगली मैत्री करतात. मंगोलियातला हा फोटो त्याचीच साक्ष देतो. या फोटो पॉपुआ न्यू गिनीतल्या टॅरी खोऱ्यात टिपण्यात आला आहे. टांझानियात टिपण्यात आलेला हा फोटो तरिंगिरे जमातीच्या महिलांचा आहे. तोर्बा प्रांतातल्या वनुअटू बेटावर हा सुंदर फोटो टिपण्यात आला आला आहे. हा फोटो केनियातल्या एका जमातीचा आहे. यांना पाहून कोणालाही लगेच भीती वाटेल. पॉपुआ न्यू गिनीत आढळणारी ही जमात लायकारपिया नावानं ओळखली जाते. टॅग्स :जरा हटकेJara hatke