this artist creates breathtaking art using sunlight
'हा' अवलिया सूर्याच्या मदतीनं साकारतो अफलातून कलाकृती By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 05:59 PM2018-09-09T17:59:54+5:302018-09-09T18:03:16+5:30Join usJoin usNext सर्वोत्तम कलाकृती साकारण्यासाठी प्रेरणा आणि कलात्मकता महत्त्वाची असते. या दोन गोष्टींच्या मदतीनं भन्नाट कलाकृती साकारता येतात. मायकल पापाडाकिस असं या अवलियाचं नाव आहे. या अवलिया चक्क सूर्य प्रकाशाच्या मदतीनं सुंदर कलाकृती तयार करतो. सूर्यप्रकाश आपल्या लाकडी कॅनव्हासच्या दिशेनं वळवायचा. तो योग्य ठिकाणी पडेल अशी व्यवस्था करायची. भिंगाच्या मदतीनं सूर्याची किरणं एकाच जागी वळवल्यानं लाकडाचा विशिष्ट भाग थोडासा पेट घेतो. याच मदतीनं मायकल उत्तमोत्तम कलाकृती तयार करतो. सूर्याच्या मदतीनं तयार करण्यात येणारी ही कलाकृती साकारणं अतिशय अवघड आहे. या कलेला हेलिओग्राफी असं म्हटलं जातं. आरसे आणि भिंगांच्या मदतीनं मायकल एकापेक्षा एक अप्रतिम कलाकृती लाकडाच्या कॅनव्हासावर तयार करतो. सूर्य किरणांच्या मदतीनं लाकडावर कलाकृती साकार करताना अतिशय संयम बाळगावा लागतो. याशिवाय एकाग्रतेचीदेखील कसोटी लागते. मात्र मायकलनं हे अगदी लिलया साध्य केलं आहे. टॅग्स :जरा हटकेकलाJara hatkeart