शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चेहऱ्यावर पुस्तक की पुस्तकावर चेहरा; भन्नाट कल्पनेनं बदलला दुकानाचा चेहरामोहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:39 PM

1 / 6
इंटरनेट आणि सोशल मीडियानं पुस्तक संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा कायम होत असते. त्यामुळेच लायब्ररी मोलाट या फ्रान्समधील पुस्तक दुकानानं भन्नाट शक्कल लढवली.
2 / 6
आपल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुस्तक ठेवून कर्मचाऱ्याचा आणि पुस्तकाचा चेहरा अनोख्या पद्धतीनं टिपण्याचा नवा प्रयोग लायब्ररी मोलाटनं केला.
3 / 6
लायब्ररी मोलाटच्या #बुकफेस कॅम्पेनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ज्या सोशल मीडियामुळे लोकांचं पुस्तकांच्या दुकानांकडे दुर्लक्ष झालं, त्याच सोशल मीडियाचा आधार घेत लायब्ररी मोलाटनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं.
4 / 6
लायब्ररी मोलाटच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तमपणे #बुकफेस कॅम्पेन राबवलं आहे.
5 / 6
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चेहऱ्याशी जुळणारी हेअर स्टाइल, तंतोतंत जुळणारे चेहऱ्यावरील भाव यामुळे हे फोटोशूट अगदी हटके झालं आहे.
6 / 6
लायब्ररी मोलाटच्या या भन्नाट फोटोंमुळे सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके