Bronze age treasure found in Sweden forest by mapmaker Thomas Karlsson
क्या बात! जंगलात एका व्यक्तीला सापडला २५०० वर्ष जुना खजिना, गळ्यातील हारासहीत ५० दुर्मीळ वस्तू... By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 3:57 PM1 / 10स्वीडनमध्ये एका व्यक्तीला जंगलात सर्व्हेक्षण दरम्यान कांस्य युगातील एक खजिना सापडला आहे. असे सांगितले जात आहे की, हा खजिना साधारण २५०० वर्ष जुना आहे. या खजिन्यात गळ्यातील हार, ब्रेसलेट आणि कपड्यांवर लावल्या जाणाऱ्या पिनसहीत साधारण ५० वस्तू आहेत. पश्चिम स्वीडनमध्ये सापडलेला हा खजिना थॉमस कार्लसन नावाच्या एका कार्टोग्राफरने शोधला. त्यांनी सांगितले की, आधी मला वाटलं की, हा एखादा लॅंप असेल. पण जेव्हा मी ते जवळून पाहिलं तर मला त्यात एक जुना दागिना दिसला.2 / 10स्वीडिश पुरातत्ववाद्यांनी सांगितले की, एका जंगलात अशाप्रकारे खजिना सापडणं जरा दुर्मीळ आहे. प्राचीन लोक अशाप्रकारच्या वस्तू नदी आणि दलदलीत भेट म्हणून सोडूत होते. हा खजिना जंगलात एका दगडाजवळ होता. असे मानले जात आहे की, हा खजिना इथे सोडण्यात आला असावा आणि जनावरे त्यावरून गेल्यावर ते बाहेर आलं असेल. 3 / 10कार्लसनने सांगितले की, ते एका नकाशावर काम करत होते. तेव्हा त्यांना धातुची एक चमकदार वस्तू दिसली. आधी त्यांना वाटलं की, हे खोटे दागिने असतील. कारण ते चांगल्या स्थितीत होते. मात्र, ते किंमती असल्याची त्यांना जाणीव झाली. असे मानले जात आहे की, हा खजिना प्राचीन काळातील लोकांनी मुद्दामहून देवासाठी ठेवला असले.4 / 10गोथनबर्ग यूनिव्हर्सिटीमध्ये पुरातत्व विभागात प्रोफेसर असलेले जोहान लिंग म्हणाले की, खजिन्यात सापडलेले दागिने फारच सुस्थितीत आहेत. त्यातील बरेच दागिने हे उच्च पदावरील महिलांसंबंधी आहेत. 5 / 10स्वीडनच्या कायद्यानुसार कोणतीही प्राचीन वस्तू सापडली तर त्याची माहिती स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला द्यावी लागते. कारण या संपत्तीवर सरकारचा हक्क असतो. त्यानंतर स्वीडिश नॅशनल हेरिटेज बोर्ड निर्णय घेतो की, याला शोधणाऱ्याला काय बक्षीस द्यावं. 6 / 10कार्लसन म्हणाले की, बक्षीस मिळणं चांगलं बोनस असेल. पण हे माझ्यासाठी गरजेचं नाही. इतिहास शोधणं माझ्यासाठी जास्त मजेदार बाब आहे. आपल्याला त्या युगाबाबत फार कमी माहिती आहे. कारण त्यावेळच्या लिहिलेल्या गोष्टी कमी आहेत.7 / 10कार्लसन म्हणाले की, बक्षीस मिळणं चांगलं बोनस असेल. पण हे माझ्यासाठी गरजेचं नाही. इतिहास शोधणं माझ्यासाठी जास्त मजेदार बाब आहे. आपल्याला त्या युगाबाबत फार कमी माहिती आहे. कारण त्यावेळच्या लिहिलेल्या गोष्टी कमी आहेत.8 / 10कार्लसन म्हणाले की, बक्षीस मिळणं चांगलं बोनस असेल. पण हे माझ्यासाठी गरजेचं नाही. इतिहास शोधणं माझ्यासाठी जास्त मजेदार बाब आहे. आपल्याला त्या युगाबाबत फार कमी माहिती आहे. कारण त्यावेळच्या लिहिलेल्या गोष्टी कमी आहेत.9 / 10कार्लसन म्हणाले की, बक्षीस मिळणं चांगलं बोनस असेल. पण हे माझ्यासाठी गरजेचं नाही. इतिहास शोधणं माझ्यासाठी जास्त मजेदार बाब आहे. आपल्याला त्या युगाबाबत फार कमी माहिती आहे. कारण त्यावेळच्या लिहिलेल्या गोष्टी कमी आहेत.10 / 10कार्लसन म्हणाले की, बक्षीस मिळणं चांगलं बोनस असेल. पण हे माझ्यासाठी गरजेचं नाही. इतिहास शोधणं माझ्यासाठी जास्त मजेदार बाब आहे. आपल्याला त्या युगाबाबत फार कमी माहिती आहे. कारण त्यावेळच्या लिहिलेल्या गोष्टी कमी आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications