शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही दोन्ही हाताने एकाचवेळी लिहू शकता का? तर पहा देशातील एक अनोखी शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 9:27 PM

1 / 5
आपल्या आजुबाजुला ९० टक्के लोक उजव्या हाताने लिखाण करतात तर १० टक्के लोक डाव्या हाताने लिहितात. मात्र या जगात अनेक प्रतिभावंत लोक आहेत जे दोन्ही हातांनी लिहू शकतात. यामध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचाही समावेश आहे.
2 / 5
मध्य प्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यातील बुधेला गावात एक शाळा आहे. या गावातील वीणा वादिनी पब्लिक स्कूलमध्ये २०० विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये प्रत्येक मुलाकडे दोन्ही हाताने लिहिण्याची कला आहे.
3 / 5
या शाळेची स्थापना माजी सैनिक वीपी शर्मा यांनी १९९९ साली केली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याशी प्रेरित होऊन त्यांनी या शाळेची स्थापना केली.
4 / 5
वीपी शर्मा यांनी सांगितले की, आम्ही या क्लासमध्ये पहिलीपासून मुलांना दोन्ही हाताने लिहिण्याचे प्रशिक्षण दिलं जाते. तिसरीपर्यंत विद्यार्थी दोन्ही हातांनी लिखाण करण्यास सक्षम होतात. सातवी-आठवीपर्यंत विद्यार्थी या कलेत प्राविण्य होतात.
5 / 5
या कलेमुळे विद्यार्थ्यांनाही त्यांचे कौशल्य वाढविण्यात मदत झाली आहे. या शाळेतील मुलांना देवनागरी, उर्दू, स्पेनिश, रोमन, इंग्रजी अशा ६ भाषांचे ज्ञान दिले जाते. ११ तासात २४ हजार शब्द लिहिण्याची क्षमता या मुलांमध्ये आहे.
टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी