पृथ्वीवर महामारी पसरवून आता अंतराळात सोनं-चांदी शोधतोय चीन, रोबोट करणार खोदकाम... By अमित इंगोले | Published: October 6, 2020 03:26 PM 2020-10-06T15:26:29+5:30 2020-10-06T15:34:07+5:30
कंपनीचं नाव ओरिजिन स्पेस आहे. याचं ऑफिस बीजिंगमध्ये आहे. हे रॉकेट मुळात एक प्री-क्रूसर मशीन आहे. ही मशीन नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन ऑपरेट करेल. (Representative Images) 2020 या सालात साऱ्या जगाच्या नजरा या चीनकडे लागल्या आहेत. जगाला कोरोना देऊन हा देश आता नॉर्मल लाइफकडे वळत आहे. एकीकडे इतर देशांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे चीनमध्ये बार आणि पबही सुरू झालेत. जग कोरोनासोबत लढण्यात व्यस्त आहे आणि चीन अंतराळात रॉकेट पाठवून उल्का पिंड खोदणार आणि त्यावर सोनं-चांदी शोधणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून चीन स्पेसमध्ये खोदकाम करणाऱ्या टेक्नॉलीजीची टेस्ट करणार. चीनला आशा आहे की, अंतराळात या खोदकामातून सोनं चांदी मिळेल.
dailystar.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने घोषणा केली आहे की, यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑरिजिन स्पेस लॉन्ग मार्च रॉकेट लॉन्च करणार. हे रॉकेट स्पेसमध्ये खोदकामाच्या प्रक्रियेची टेस्ट करणार.
कंपनीचं नाव ओरिजिन स्पेस आहे. याचं ऑफिस बीजिंगमध्ये आहे. हे रॉकेट मुळात एक प्री-क्रूसर मशीन आहे. ही मशीन नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन ऑपरेट करेल.
या रॉकेटला नियो १ असं नाव देण्यात आलं आहे. याचं वजन ३० किलो असून जे पृथ्वीच्या चारही बाजूने पाचशे किलोमीटरच्या उंचीवर राहणार.
निया १ चा उद्देश हा आहे की, अंतराळात खोदकाम करायचं. याचा उद्देश स्पेसक्राफ्टचं ऑर्बिटल ऑपरेशन, छोट्या स्पेस ऑब्जेक्टवर जाणं, स्पेसक्राफ्ट आयडेंटिफिकेशन आणि कंट्रोल व्हेरिफाय करणं.
चीनला यात यश मिळालं तर हे पाऊल क्रांतिकारी ठरेल. आजपर्यंत कोणताही देश अंतराळात खोदकाम करू शकलेला नाही.
जगातले अनेक देश अंतराळात खोदकाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजून कुणालाही यात यश मिळालेलं नाही. जर हे यश चीनला मिळालं तर ते २०२१ किंवा २२ पर्यंत एक प्रोग्राम लॉन्च करतील.
अभ्यासाचा विषय सांगायचा तर अंतराळात वर्षानुवर्षे अनेक उल्कापिंड आहेत. ज्यांवर मोठ्या प्रमाणात सोनं, लोह आणि चांदी उपस्थित आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, उल्कापिंडामध्ये असलेलं लोह हे पृथ्वीवरील लोहापेक्षा अनेक पटीने जास्त आहे.