शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या शॉपिंग मॉलच्या सिक्युरिटी गार्डला पाहून लोकांना फुटतो घाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 3:25 PM

1 / 8
मोठ-मोठ्या कंपन्या किंवा भव्य मॉल्समध्ये सरक्षेसाठी कितीतरी सिक्युरिटी गार्ड लावलेले तुम्ही पाहिले असतील. पण लंडनच्या एका प्रसिद्ध शॉपमध्ये एक वेगळाच चौकीदार तैनात करण्यात आला आहे. या चौकीदाराला पाहून बघणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळतं.
2 / 8
लंडनच्या या प्रसिद्ध स्टोरचं नाव हारोड्स असं आहे. नुकतीच या कंपनीने त्यांची डॉक्युमेंटरी जारी केली होती. ज्यात या स्टोरचा इतिहास सांगण्यात आला. ही डॉक्युमेंटरी चांगलीच चर्चेत आली होती. याचं कारण होतं, या स्टोरमधील अजीब चौकीदार. याला स्टोरच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं.
3 / 8
हे स्टोर फार जुनं आणि प्रसिद्ध आहे. इथे अनेक बहुमूल्य वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. २००७ मध्ये या स्टोरमध्ये एक फार किंमती रत्नांनी जडलेली सॅंडल आणली गेली होती. या सॅंडलमध्ये बहुमूल्य रुबी स्टोन लावण्यात आला होता. त्यामुळे या सॅंडलची सुरक्षा एक आव्हानच झालं होतं.
4 / 8
असे सांगितले जात आहे की, रत्नजडीत या सॅंडलची किंमत साधारण ४.५० कोटी रुपये होती. अशात या स्टोरच्या मालकांनी या सॅंडलच्या सुरक्षेसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आणि या सॅंडलची सुरक्षा एका कोब्रा सापावर सोपवली. असे म्हणतात की, या सापामुळेच ही सॅंडल स्टोरमध्ये आजही सुरक्षित आहे.
5 / 8
मीडिया रिपोर्टनुसार, हारोड्स नावाचं हे स्टोर १५० वर्ष जुनं आहे. या स्टोरची सुरुवात १८४९ मध्ये झाली होती. आता संपूर्ण इंग्लंडमध्ये या स्टोरने पाय पसरले आहेत. आता या स्टोरच्या ३०० पेक्षा जास्त शाखा आहेत. (Image Credit : www.travelingmom.com)
6 / 8
असे म्हटले जाते की, १८९८ मध्ये या स्टोरमध्ये एस्कलेटर म्हणजेच स्वयंचलित पायऱ्या लावण्यात आल्या होत्या. तेव्हा ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच याचा प्रयोग झाला होता. पण हे लोकांसाठी नवीन असल्याने त्यांना त्यावरुन ये-जा करणे कठीण होत होते. त्यांना यामुळे तणाव येत होता.
7 / 8
असेही म्हटले जाते की, ब्रिटनचे प्रिन्स विलियम्स आणि हॅरी जेव्हा लहान होते, तेव्हा ते इथे व्हिडीओ गेम खेळण्यासाठी येत असत.
8 / 8
तर लोकांना तणावातून मुक्त करण्यासाठी स्टोरकडून पुरुषांना ब्रॅंडी दिली जात होती. तर महिला बेशुद्ध पडू नये म्हणून त्यांना मीठ हुंगवलं जायचं. या स्टोरची खासियत म्हणजे जगभरातील खेळणी इथे आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLondonलंडन