'या' भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत आहे आलिशान बंगला, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:40 PM2020-01-22T14:40:34+5:302020-01-22T14:53:03+5:30

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारे भारतीय वंशाचे डॉ. किरण पटेल आणि त्यांची पत्नी डॉ. पल्लवी पटेल यांचा बंगला सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.

शिक्षण, खेळ, कला यासह अनेक क्षेत्रात पटेल दाम्पत्याने उल्लेखनीय योगदान दिलं आहे. फ्लोरिडामध्ये त्यांचा आलिशान बंगला आहे.

फ्लोरिडा शहरातील कॅरोलवूड परिसरातील व्हाईट ट्राऊट तलावाजवळ तब्बल 17 एकर जागेत त्यांचा मोठा बंगला आहे.

फ्लोरिडामधील हा सर्वात मोठा बंगला असून मुख्य इमारतीमध्ये 8400 फुटाच्या दोन विशाल विंग तयार करण्यात आल्या आहेत.

घरातील एका विंगमध्ये पटेल दाम्पत्य राहतात. तर दुसऱ्या विंगमध्ये त्यांचा मुलगा आणि त्याचं कुटुंब राहतं.

आलिशान बंगल्यामध्ये मंदिर, मिनी थेटर, तीन गेस्ट हाऊस आणि 12 गाड्या उभ्या करता येतील इतकं मोठा पार्किंग एरिया आहे. तसेच स्टाफ हाऊस आणि कॉमन मेटेनेंस बिल्डिंगदेखील आहे.

बंगल्यापासून शाळा, विमानतळ, ऑफिस, हॉस्पिटल जवळ आहे. तसेच बंगला तयार करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.