शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोमान्स करताना गर्लफ्रेन्डची अजब डिमांड, हैराण झालेल्या व्यक्तीने मागितला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:40 AM

1 / 10
कपल्समध्ये विचित्र रोमान्सच्या बातम्या नेहमीच समोर येत असतात. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीची रोमान्स करतानाची इच्छा लोकांना सांगितली आहे. त्याच्या प्रेयसीची ही इच्छा वाचून तुम्हीही चक्रावून जाल. सोबतच प्रश्नही पडेल की, लोकांच्या अशाही फॅंटसी असतात? (प्रातिनिधीक छायाचित्रे)
2 / 10
एका व्यक्तीने सांगितलं की, त्याची प्रेयसी संबंध ठेवताना त्याला तिचा गळा दाबण्यास सांगते. जेणेकरून तिला बेशुद्ध झाल्यासारखं वाटेल. त्याने सांगितलं की, तिला असं केल्यावर आनंद मिळतो.(प्रातिनिधीक छायाचित्रे)
3 / 10
'द सन'च्या रिपोर्टनुसार, प्रियकर म्हणाला की, माझ्या प्रेयसीने मला शारीरिक संबंध ठेवताना तिला गळा दाबण्यास सांगितले. जेणेकरून तिची स्थिती बेशुद्ध झाल्यासारखी होईल. तो म्हणाला की, तो हे ऐकून हैराण झाला, कारण त्याने आधी असं काही केलं नव्हतं.(प्रातिनिधीक छायाचित्रे)
4 / 10
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने सांगितलं की, 'मी ५२ वर्षांचा आहे आणि माझी प्रेयसी ४९ वर्षांची आहे. आम्ही ऑनलाइन भेटल्यावर चार महिनेआधी डेटींग सुरू केलं होतं. (प्रातिनिधीक छायाचित्रे)
5 / 10
ती एक चांगली महिला आहे आणि रिटेल क्षेत्रात चांगली नोकरी करते. तिची मुले मोठी झाली आहेत आणि स्वतंत्र जीवन जगतात. माझा ६ वर्षाआधी घटस्फोट झाला आहे आणि मला एक मुलगी आहे'.(प्रातिनिधीक छायाचित्रे)
6 / 10
या व्यक्तीने 'द सन'ला सांगितलं की, 'आमची आतापर्यंतही सेक्स लाइफ फार चांगली राहिली आहे. ती फार साहसी आहे आणि कामात अजिबात अडचण आणत नाही. ती परफेक्ट आहे ज्यामुळे मला ती आवडते'.(प्रातिनिधीक छायाचित्रे)
7 / 10
व्यक्तीने त्याच्या प्रेयसीच्या अजब डिमांडबाबत सांगितलं की, 'एके रात्री काही ड्रिंक्सनंतर आम्ही आमच्या लैंगिक जीवनाबाबत बोलण्यास सुरूवात केली. मी सांगितलं की, माझ्या ९ पार्टनर होत्या आणि तिनेही सांगितलं की, तिच्या आयुष्यात ७ लोक येऊन गेले'.(प्रातिनिधीक छायाचित्रे)
8 / 10
तो म्हणाला की, 'त्यानंतर आम्ही शारीरिक संबंध ठेवत असताना तिने मला माझे हात गळ्यावर ठेवण्यास आणि गळा दाबण्यास सांगितलं. मला वाटलं की, ती गंमत करत असेल, पण नंतर तिने मला समजावलं की तिला खरंच असं करायचं आह. ती म्हणाली की, तिच्या गळ्यावर एका पुरूषाचा हात असला की, ती बदलते'.(प्रातिनिधीक छायाचित्रे)
9 / 10
तो म्हणाला की, मी तेच केलं जे तिने सांगितलं. मात्र, हळुवार गळा दाबला. मला त्यावेळी असं वाटलं की, मी अॅडल्ट सिनेमात काम करत होतो. नंतर मला हे फार भयानक वाटलं. हे माझ्यासाठी पूर्णपणे अजब आणि नवीन होतं. या व्यक्तीने आता लोकांकडे या समस्येवर उपाय मागितला आहे. (प्रातिनिधीक छायाचित्रे)
10 / 10
व्यक्ती म्हणाला की, श्वास कोंडने किंवा 'ब्रीद प्ले'सोबत ऑक्सीजनचा स्तर कमी केला तर उत्साह वाढतो. पण हे घातकही ठरू शकतं. तज्ज्ञांनुसार, ही एक फॅंटसी आहे. पण धोकादायक आहे. कुणीही या गोष्टी करण्यासाठी कुणावरही दबाव आणू नये. (प्रातिनिधीक छायाचित्रे)
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिपLondonलंडन