Haryana woman parveen kau who became sarpanch at 21 sets up cctv library in village
जिंकलंस पोरी! वयाच्या २१ व्या वर्षीच झाली सरपंच अन् गावाचं रुपंच पालटलं; पंतप्रधानांनीही घेतली दखल By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 06:08 PM2020-09-14T18:08:06+5:302020-09-14T19:09:50+5:30Join usJoin usNext संघर्षामय जीवनातून पुढे गेलेल्या आणि आपल्या समाजात प्रकाशात नेणाऱ्या महिलांच्या अनेक कथा कहाण्या तुम्ही वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हाला वयाच्या अवघ्या २१ व्या गावचं सरपंच पद पटकावलेल्या एका तरूण व्यक्तीमत्वाबद्दल सांगणार आहोत. या धडाकेबाज तरूणीचं नाव प्रवीण कौर आहे. हिची कामगिरीवाचून तुम्ही मुर्ती लहान पण किर्ती महान असं म्हणाल. प्रवीण कौर ही तरुणी अवघ्या २५ वर्षांची आहे. मात्र ती हरियाणामधील गुहला येथील ककराला गावाची सरपंच आहे. प्रवीणनं कुरुक्षेत्र विद्यापिठामधून बॅचलर्स इन टेक्नोलॉजीची पदवी घेतली आहे. गावकऱ्यांच्या इच्छेने ककराला गावाची सरपंच झाली. या गावाची लोकसंख्या १२०० इतकी आहे. खासगी नोकरी सोडून तिंने निवडणूक लढवायचं ठरवलं आणि बघता बघता विजयही मिळवला. या यशामागे मला माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही प्रवीण अभिमानाने सांगते. सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रवीणनं गावातील प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही लावले आहेत. इतकंच नाही तर गावात वॉटर कुलर बसवले आहेत. शुद्ध पाण्याबरोबरच गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्यांना थंड पाणी मिळावे म्हणून हे वॉटर कूलर बसवण्यात आले आहेत. काम करण्याची पद्धत आणि प्रभावी बुद्धीमत्तेमुळे तिनं कमी वेळात गावातील बरीच कामं केली आहेत. गावामध्ये पंचायतीच्या माध्यमातून प्रवीणने ग्रंथालय सुरु केलं आहे. विशेष म्हणजे प्रवीणनं डोक्यावर पदर घेण्याच्या प्रथेला विरोध केला आहे. तिनं गावातील लोकांना विश्वासात घेऊन आपलं म्हणणं पटवून दिलं. तिच्या प्रयत्नांमुळे आज गावातील स्त्रिया मनमोकळं जीवन जगत आहेत. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील प्रवीणच्या कामाचे कौतुक केलं होतं. गावामध्ये कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये म्हणून शौचालये बांधण्यापासून ते जनजागृती करण्याचं काम प्रवीणनं केलं. हरियाणामधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रवीणने भाजपाचा प्रचार केला होता. प्रवीणच्या कामाबद्दल आणि आदर्श गावाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सुरु केलेल्या वाटचालीसाठी नेहमीच सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो. (image credit- Social Media, Twitter, praveen.kaur.9406)टॅग्स :जरा हटकेसोशल व्हायरलहरयाणाप्रेरणादायक गोष्टीJara hatkeSocial ViralHaryanaInspirational Stories