interesting facts and history of parle g that will make every indian proud
पार्ले-जीबद्दलच्या 'या' गोष्टींचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल! By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 02:43 PM2019-01-15T14:43:41+5:302019-01-15T14:46:58+5:30Join usJoin usNext पार्ले कंपनीची सर्वात जुनी फॅक्टरी विलेपार्ल्यात आहे. काही महिन्यांपूर्वीच ही फॅक्टरी बंद झाली. आता तिथं कंपनीचं मुख्यालय उभारण्यात येणार आहे. पार्ले-जी बिस्कीट बाजारात दाखल होऊन अनेक वर्षे झाली. मात्र त्याचा दर्जा अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे पार्ले-जी हे जगातील सर्वाधिक खपाचं बिस्कीट आहे. अनेकांना पार्ले-जी मधील 'जी'चा अर्थ जिनियन वाटतो. मात्र त्याचा खरा अर्थ ग्लुकोज आहे. 1980 पर्यंत पार्ले-जी बिस्कीट पार्ले ग्लुकोज नावानं ओळखलं जायचं. मात्र त्यानंतर लहान मुलं आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे नाव बदलून पार्ले-जी असं करण्यात आलं. चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र पार्ले-जीचं वर्षभरातील उत्पादन इतकं जास्त आहे की संपूर्ण चीननं ही बिस्कीटं खाल्ली, तरी भरपूर बिस्कीटं उरतील. गंमत म्हणजे आता हे तुम्ही वाचत होतात, त्यावेळी जगातील 4551 व्यक्ती पार्ले-जी खात होत्या. पार्ले-जीचा जन्म भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच झाला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 8 वर्षे म्हणजेच 1939 मध्ये पार्ले-जीचं उत्पादन सुरू झालं होतं. पार्ले-जी 1 बिलियन बिस्कीटांच्या पाकिटांचं उत्पादन करतं. या बिस्कीटांची विक्री देशातील 5 मिलियन दुकानांमध्ये होते. एका दिवसाला पार्ले-जीची 400 मिलियन बिस्कीटं तयार होतात. पार्ले-जीचं उत्पादन इतकं प्रचंड आहे की एका महिन्यात तयार झालेली बिस्कीटं रांगेत ठेवली, तर पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर भरुन निघेल. हे अंतर 7.25 लाख किमी इतकी आहे. टॅग्स :अन्नfood